Blog

आठवणीतले बालपण

"उठा रे दोघ, लवकर उठायचं जरा व्यायाम करायचा, सगळं आवरून अभ्यासाला बसायचं, सकाळी सकाळी अभ्यास चांगला लक्षात राहतो." दादांची हाक ऐकू आली. की आम्ही डोळे चोळत उठून बसायचो. माझे वडिल 'नेव्ही' मध्ये असल्याने कडक शिस्तीचे, कमालीची स्वच्छता ठेवणारे, कामे वेळेत झालीच पाहिजेत, कधीही आळसाने दादा झोपलेत असे आम्ही पाहिलेले आठवत नाही, कायम कामात असलेले. आपल्या... Continue Reading →

Featured post

गुरुदक्षिणा

प्राजक्ता रुद्रवार आज सकाळपासुनच त्याच्या पोटात कालवाकालव होत होती. सरांचे आभार कसे मानावे हे त्याला कळत नव्हते. आज हे जग नव्याने बघताना त्याला सरांची आठवण येत होती.त्याच्या प्रगतीसाठी सरांनी घेतलेले कष्ट तो जाणुन होता. लहान असतानाच आई वारली होती, वडिल सततच आपल्याच व्यापात असतं. त्यामुळे त्याला येत चाललेला एकटेपणा, बुजरेपणा जाणला तो दिक्षित सरांनीच. "राघव...तु... Continue Reading →

Featured post

आनंद

© अपर्णा देशपांडे शांत, स्थिर पाणी, त्यावर मावळतीची केशरी गुलाबी छटा, पाण्याची हलकी खळखळ, सगळं कसं निरामय. आकाशात परतीचे प्रवासी सूर्याला त्याची वेळ संपल्याचे खुणावत होते. नदीकाठी मोठाले खडक एखाद्या व्रतस्था सारखे निश्चल. तिथेच एका खडकावर पार्थ सुन्न बसलेला. जणू युगानुयुगे ह्या सृष्टीचा तोही एक हिस्सा.निसर्ग हा बघणाराच्या नजरेत असतो आणि पार्थ ला आज तो... Continue Reading →

Featured post

बोन्साय

एका छानश्या रविवारी माझे अतिशय जवळचे मित्र श्री इंगळे यांच्या घरी सहकुटुंब भोजनाचे निमंत्रण असल्याने जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी जात असल्याने वैभवला (त्यांचे ५ वर्षीय चिरंजीव) त्याचा आवडता खावू म्हणून काजू बर्फी घेतली. माझ्या पत्नीनेही काहीतरी घेतल्याच मी पाहिलं. “काय हो काय घेतलय” विचारताच गालात मिस्कीलपणे हसत तिने मला गाभोळलेल्या चिंचांचे कडे दाखवले आणि... Continue Reading →

Featured post

ऋणानुबंध

"आई मी निघाले ग…येते…"आईच्या उत्तराची वाट न पहाता सावी घराबाहेर पडलीसुध्दा."अगं डब्बा तरी घेऊन जा.."म्हणत कुसुमताई स्वयंपाकघरातुन बाहेर येईपर्यंत सावी गेटच्या बाहेर पडलेली होती."हिचं हे नेहमीचचं आहे… कसं होणार हिचं ही कायमची काळजी लागुन राहिली आहे…"अस स्वत:शीच पुटपुटत त्या घरात आल्या. सावी, एक नामवंत वकील होती. तिच्याकडे येणारया घटस्फोटाच्या केसेसमधे यशस्वीपणे घटस्फोट मिळतात अशी तिची... Continue Reading →

Featured post

बसस्टँड…!

''आलं मनाला केलं क्षणाला नाहीतर बसलं उन्हाला''..असंच घडतं नेहमी माझ्या बाबतीत सुटीचा दिवस होता म्हणून रात्री चंद्र ताऱ्यांना गवसणी घालण्यात जरा जास्तच वेळ लागला असावा..म्हणून झोपेतून उशिरा उठलो, मित्रमंडळी बाहेर गेली होती. जग एवढं व्यस्त झालंय की आपण एवढे त्रस्त का ? हा एक प्रश्नच आहे.. थोडं पुस्तक वाचलं पण मन काय घरात रमेना..म्हणून वाट... Continue Reading →

Featured post

व्हेंटिलेटर

रात्री अडीच वाजता दारावरची बेल सारखी सारखी वाजल्याने काहीशा त्रासिक स्वरात मारिया उठली, कारण ती व कुंजा ( कुंजात्ता ) बारा वाजता हॉस्पिटल मधून सेंकड शिफ्ट करून घरी परतल्या होत्या. तर कार्तिकी व रिया ह्या नाईटशिफ्ट साठी हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या. दारात शेजारील फ्लॅट मधील देसाई काकू काहीशा काळजीच्या स्वरात बोलल्या…."मारिया सिस्टर… रेवतीला खूप त्रास... Continue Reading →

एक फुल, चार हाप

पुण्याच्या एस.टी. बसस्थानकावरून शिरूरकडे बस धावू लागली.बस माणसांनी खचाखच भरली होती.शहरातून काही खरेदी करून माणसे गावाकडे चालली असल्यानं एस.टी.बसमध्ये अधूनमधून काही बोचकी,पिशव्या,काही खोकी मांडून माणसं विसावली होती.उभे राहून प्रवास करणारे मात्र राजेशाही थाटात आसनस्थ झालेल्या व्यक्तिकडे बघून उगाचच नाक - डोळे मोडीत होते.अशा उभ्या राहिलेल्या प्रवाशांमध्ये सुमारे सत्तर - पंच्चाहत्तरच्या वयाचा टप्पा पार केलेली एक... Continue Reading →

माधवराव

आपल्या दैनंदिन व्यवहारात नात्यात लग्नसमारंभात अनेक नमुन्याचे मित्र भेटतात पैकी काही लक्षात राहतात काही प्रसंगाने आठवतात.आज सकाळ पासून माधवरावांनी डोकं उठवलं होत. कितीही प्रयत्न केले तरी ते माझा पिच्छा सोडत नव्हते.तसं मी माधवरावाना कधी भेटलो नव्हतो नुसत भेटलो नव्हतो असं नाही तर अशा व्यक्तीला पाहिलं सुध्दा नव्हतं तरी या माधवरावानी माझ्या जीवनात प्रवेश नव्हे तर... Continue Reading →

स्वामीनिष्ठा

एक छोटेसे खेडेगाव असते." रुकडी' त्याचे नाव "कोल्हापूर'" जिल्हा. खेडेगाव म्हणजे अगदी खेडेगाव. तिथे हातावर मोजण्या इतपत ब्राह्मणांची घरे होते. बाकी सर्व बाराबलुतेदार. सर्वजण सुखाने नांदत होती. अजून तरी सर्वांच्यात एकी होती. लांड्यालबाड्या नव्हत्या. म्हणूनच सर्वजण वेगवेगळे असूनही एकत्र सुखाने नांदत होते.इथे एक बापूराव रुकडीकर म्हणून सावकार राहत होते. ते सावकारकी  करायचे म्हणून सावकार नाव पडले.... Continue Reading →

खिडकी

दर महिन्याच्या बावीस तारखेला मासिक उपक्रमाअंतर्गत शब्दवेल साहित्य समुहात मी बिल्लोरीकिरण या शीर्षकाअंतर्गत मी कथा लिहायला सुरूवात केली . माझे स्नेही श्री. प्रवीणजी बोपुलकर शब्दवेल समूह प्रमुख यांना मी माझा मनोदय सांगितला तसे त्यांनी लगेच " ताई , लिहा ना समूहासाठी , दैनिक , साप्ताहिक , मासिक तुम्हांला जसे जमेल तसे कथा , कविता ,... Continue Reading →

गंध मैत्रीचा

घाडगे आजोबा रोज सकाळी पूजेसाठी परसबागेतील फुलं काढायचे. मुखी हरिनाम आणि दुसरीकडे पटापट फुलं काढून तबकात ठेवायचे. रंगीबेरंगी, नाजूक अशी उमललेली टवटवीत फुलं पाहूनच कसं तजेलदार वाटायचं. आजोबा रोज फुलं काढून त्यांच्यावर पाण्याचा हबका मारून ठेवायचे आणि थोड्या वेळाने पूजा करायचे. पण त्या दिवशी काही तरी वेगळं घडलं. काय झालं कळायला काहीच मार्ग नव्हता. पण... Continue Reading →

ऋतूची कार्यतत्परता

   आज ऑफिसला उशीर झाला होता. सीमा घाईने स्वतःची नि मुलांच्या शाळेची तयारी करत होती. आनंद नेहमीप्रमाणे टूरवर गेला होता. महिन्यातून पंधरा दिवस तो टूरवरच असायचा. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी सीमालाच सांभाळावी लागत होती. मुले लहान असल्याने त्यांची शाळेची तयारी, गृहपाठ, प्रकल्प तीच पहात असे. शिवाय हल्ली तिच्या ऑफिसचे कामही खूप वाढले होते. बॉसने गेल्या... Continue Reading →

रथ

            आप्पासाहेब बिल्डिंगच्या खालच्या कट्यावर रथाची वाट पहात बसले होते. आज ते आणि त्यांचा मित्र वसंता त्यांच्या लाडक्या नानाला भेटायला जाणार होते. या सर्व मित्रांना 'रथ' ही पर्वणीच ठरली होती. खरंतर आप्पांच्या घरी दोन मर्सिडीज होत्या. लोक त्यांना म्हणतही 'घरच्या एवढ्या गाड्या सोडून तुम्ही तुमच्या रथातून काय सगळीकडे फिरता ?... Continue Reading →

तहान

     करुणा निकेतन क्रेशच्या पायर्‍या उतरून जस्मीन खाली आली आणि पाठोपाठ क्रेशमधील सारी जणही आली. गेटपर्यंत. तिला निरोप द्यायला. गेटच्या बाहेर सुनीता केव्हाची टॅक्सी थांबवून उभी होती. जस्मीनचे पाय मात्र तिथून निघता निघत नव्हते. पावले काशी जडशीळ झाली होती. क्रेशच्या दृष्टीने आत्ताचा क्षण ऐतिहासिक महत्वाचा होता. पंचवीस वर्षापूर्वी क्रेशने आपल्यात सामावून घेतलेली छोटी चिमखडी... Continue Reading →

मूठ माती

ओबड-धोबड खाचखळग्याचा रस्ता कापत गाडी पुढे धावत व्हंती. गाडीत निपचिप शरीराचीवळकुंडी करून पडलेल्या पमानं डोळे गच्च मिटले असले तरी गाडीच्या प्रत्येक गचक्यासरशी तिच्या आयुष्यातला एक एक गचका त्या गाडी सारखाच डोळ्यासमोर हेलकावे घीत व्हंता. खड्ड्यांनीच भरलेल्या आपल्या आयुष्याचा रस्ता आता तुडवायला नकं झालंय… पण ही माणसं का घीऊन चालले असतील? जगानं अव्हेरलेल्या जीवाला जवळ करणारी... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया