एक वारी अशीही

शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही आकाश शाळेत आला नव्हता. तो शाळेत यायला तयारच नाही हे समजल्यावर प्रिया अस्वस्थ झाली होती. तिच्या जीवाची तगमग होत होती. शेवटी ती मुख्याध्यापकांच्या परवानगीने आकाशच्या घरी पोचली.ती दिसताच आकाश  घरात लपून बसला. गरीब, कष्टकरी आई-बापाच्या मुलाची शाळेविषयीची नावड तिला सहनच होईना. ती त्याच्या घरी पडवीतील खुर्चीवर बसली. आई बाबा... Continue Reading →

अवघा रंग एक झाला

शाम आणि मोहसीन.. दोघंही तिशीच्या आसपासचे..साठेक वर्षे ह्यांची कुटुंबं एका वाड्यात राहतायत..पण दोघांमधून विस्तव जात नाही.मोहसीन वरचेवर मैत्रीचा हात पुढे करायचा. पण केवळ तो मुस्लिम आहे म्हणून शामच्या डोक्यात जायचा.अधूनमधून वेगवेगळ्या कारणांनी दोघांत खडाजंगी उडायची.शामच्या बाबांनी शरदरावांनी अनेकदा मोहसीनशी मैत्री करण्याबाबत सुचवलं..पण शामला काही ते जमत नव्हतंच.आठ दहा दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली होती.गेल्या काही... Continue Reading →

मुक्या

'मुक्या’ असा फिरायला लागला की सारा गाव गोळा होई हमरस्त्यावर. दर चार पावलावर लोकं घोळका करीत अन् मग गावात गप्पांना ऊत येई. हमरस्ता कसला न कसलं गाव. चांदबाच्या काळ्या कातळाखालची ही एक वाडी. शे-पाचशे उंबरा. कातळावरून पाणी पडे आनं मृग नक्षत्रात त्याचा झरा होई. पुजारीबुवांनी खण-नारळानं ओटी भरली की गावच्या शेतात हिरवं सोनं येई. गावाला... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया