मुडदा

     दत्ता, प्रकाश आणि सुलभा वडिलांना आण्णा म्हणायचे. पितृपंधरवडा सुरु असल्याने आण्णा गावातील सर्वांचे आमंत्रण बेतवायचे. जमलं तर घरी यायचे नायतर तिथंच टापा हाणीत मुक्काम ठोकायचे. मात्र हा त्यांचा बेफिकीरपणा घरच्यांना चांगलाच नडला.       नवमीच्या दिवशी आण्णा लेकीकडे निघाले. लांबून गाडीनं वळसा घालुन जाण्यापेक्षा एवढं टेकाड पालथं घातलं की दऱ्यात पहिल्यांदा लेकीचंच घर... Continue Reading →

मम्मी, तुस्सी ग्रेट हो !

निशा मैत्रिणीसोबत व्हाटसअॅपवर चॅटिंग करण्यात मग्न असतानाच तिच्या मम्मीन 'निशू s' म्हणून हाक मारली अन् ती 'आले गं' म्हणीत तडक किचनमध्ये आली. तिनं विचारलं, "आवरलं का गं तुझं, मम्मी?" "झालंच हं दोन मिनटात.. तुझंच काही राहिलं असेल तर बघ.. "डब्बा भरीत मम्मी म्हणाली. "माझं आवरलंय सगळं मघाशीच.. चल पटकन, ऊन चटकत आहे .." "हो, झालंच... Continue Reading →

संवाद

"खरंच माझी आई पण काँलेजमधे जाणार का टिचर?...मी सांभाळेन लहान भावंडाना, संध्याकाळचा स्वयंपाक पण करेन टिचर... आईला नक्की काँलेजमधे शिकवा..." बारा वर्षांच्या अंशुचा उत्साह बघुन मुनासोबत टिचरचेही डोळे भरुन आले. पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतातुन कुटुंबासोबत तिशीतली मुना पुण्यात रहायला आली होती. शिक्षण काहीच नव्हतं. नवरा बांधकामावर मजुर, सहा मुलं, साधारण 3 वर्षे ते 12 वर्षे वयाची.... Continue Reading →

प्रसंगावधान

प्रदीप गांधलीकर त्यावेळी मी नुकताच महाविद्यालयात जाऊ लागलो होतो. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण खेड्यात पार पडले; आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी अकरावीत तालुक्याच्या गावी अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. घरात बरीच वर्षे मी एकटाच असल्याने लाडाकोडात वाढलो होतो. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर होता. शेती तशी जेमतेमच होती. प्रसंगी वडील काबाडकष्ट करीत; परंतु त्यांनी कधी मला परिस्थितीची... Continue Reading →

तुम साथ हो

 शीतल दरंदळे आज HR कडून मेल आल्यावर विभा खूप वैतागली होती. 50 percent salary cut for next 3 months. ही ओळ तिला वारंवार दिसत होता. आधीच वर्क फ्रॉम होम ने काम वाढलंय,घरी करा,ऑफिस साठी सतत present रहा. त्यात अबीर ला ही जॉब ची guarantee वाटत नव्हती. होम लोन,कार लोन अलोक ची शाळेची फी,घरखर्च कसं निभावणार?... Continue Reading →

जळमटं

बबन पोतदार, ग्रामीण कथाकार 'चुलत्यानं पेटवून घेतलंया. कराडला कृष्णा हॉस्पिटलात ठेवलंया.' असा उडता निरोप मिळाल्याबरोबर मी सामानाची आवराआवर केली आन् टाकोटाक एस.टी.त बसलो. एस.टी. निम्मी अर्धी रिकामीच हुती. एका खिडकीजवळच्या सीटवर बसलो. मन सैरभैर झाल्यालं. कायसुदिक सुचेनासं झालं. मनाची उलथापालथ चालल्याली. एका एका इचारानं मन ढासळायला लागलं. नजरं म्होरं काकू उभी न्हायली. कपाळावर मेणाचं ठसठशीत... Continue Reading →

सप्तपदी…

 प्राजक्ता रुद्रवार सप्तपदीचे एक एक पाऊल टाकताना तिला आजवर घडत गेलेल्या घटनांची आठवण येत होती. पुढे चालणारया त्याच्या हातात हात घालुन ती एक एक पाऊल सोबतीने टाकत होती. तिने पायाच्या अंगठ्याने पहिल्या सुपारीला स्पर्श केला व वर-वधू एकमेकांचा सन्मान करु असं म्हणत पहिला फेरा पुर्ण केला."हो,बरोबर तर आहे,मनात एकमेकांविषयी सन्मान नसेल तर ते नातं टिकण... Continue Reading →

वंदी मारतम् 

अनिल पवळ कुंभीजकर आठवीत व्हतो. आठवा तास पी.व्ही. आ प्पाचा. आप्पा आमाला हिंदी शिकवाय. दिसायला पी.व्ही. आप्पा म्हणजे साक्षात यम. फक्त दिसायला यम बर का! माणूस म्हणचाल तर एकदम शांत. वर्गात शिकवतानी एकादा जोक फिक झाला तर सगळं आंग गदागदा हलवून खदाखदा हसायचे. तर असे हे आप्पा त्या ऐतिहासिक दिवशी आम्हाला कसलं तरी व्याकरण शिकवीत... Continue Reading →

आनंद

© अपर्णा देशपांडे शांत, स्थिर पाणी, त्यावर मावळतीची केशरी गुलाबी छटा, पाण्याची हलकी खळखळ, सगळं कसं निरामय. आकाशात परतीचे प्रवासी सूर्याला त्याची वेळ संपल्याचे खुणावत होते. नदीकाठी मोठाले खडक एखाद्या व्रतस्था सारखे निश्चल. तिथेच एका खडकावर पार्थ सुन्न बसलेला. जणू युगानुयुगे ह्या सृष्टीचा तोही एक हिस्सा.निसर्ग हा बघणाराच्या नजरेत असतो आणि पार्थ ला आज तो... Continue Reading →

साथ

आमची सोसायटी तशी उच्च मध्यमवर्गीयांची. सर्व सोयी सुविधांनी युक्त. येथे छान बाग आहे, छोटस मंदिर आहे, रेक्रीयेषन होल आहे, फिरण्या साठी स्वतंत्र व्यवस्था आहे.सार कस छान आहे.तरी पण बागेतली काही झाड जरा सुकलेली दिसताहेत, फांद्या वेड्या वाकड्या वाढल्याने आणि कंपाउंड ओलांडून पलीकडच्या सोसायटीत गेल्याने त्यांच्यात पूर्वी सारखा उमदेपणा वाटत नाहीये. फिरण्याच्या रस्त्यावर धूळ आलीय, पर्किंच्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया