हा माझा मार्ग एकला

बाकीच्या शिष्यमंडळींसोबत भानूदास पण चालत होता, चालता चालता त्याला ओळखीचं गाव दिसलं. खरंतर या गावात त्याला अजिबात जायचं नव्हतं, बाकीच्या शिष्यबंधूंना त्यांनी तसं सांगून पण पाहिलं, पण त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं जाताना त्या गावातून जाणं गरजेचंच होतं, दुसरा मार्ग नव्हता. अखेर नाईलाजाने तो त्या गावात शिरला.गावात शिरताच त्याला सर्व आठवणी आल्या. दुपारी जेवणाची... Continue Reading →

पुनर्जन्म

 आज सेंट्रल पार्क मध्ये एका कलाकाराच्या पेंटिग्स चं एग्झिबीशन भरलं हाेतं. "रेवाही आपल्या ५ वर्षाच्या मुलीला रुताला घेऊन पेंटिग्स बघायला आली" हाेती. एकापेक्षा एक सुंदर सुंदर चित्र हाेती तिथे पण "रेवाची "नजर एका पेंटिंग वर स्थिर झाली. एक साधा ड्रेस परिधान केलेली तरुणी, तिच्या समाेर एक लाल कुडता घातलेल्या तरूणाच्या कपाळाला  "ती" कुंकू लावतेय असं... Continue Reading →

करार

     आजचा दिवस माझ्यासाठी अर्थात प्रसिद्ध लेखिका केतकीच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात यावा असाच खरंच खास दिवस. एका अलिखित करारानुसार मी दारिद्र्याच्या गलिच्छ नाल्यातून सोय़ीस्करपणे अलगद बाहेर आले.व्यवहारी जगात गरीबांना आपल्या मनातील भावनांना तिलांजली द्यावी लागते.गरिबीतील ते जगणं केवळ जीव जगवण.....माझा नाल्यातून जीवन प्रवास..... तिथूनच नदीला कडकडून भेटले. शेवटच्या टप्प्यात अथांग सागराची ओढ होतीच...पोहोचले... Continue Reading →

धनी

गुहागर-विजापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरवात झाली होती. शेकडो वर्षांपासून मायेची सावली देणार्‍या मोठ-मोठ्या वडांच्या झाडांची जणू कत्तलच सुरू होती. मुळापासून तोडलेले झाड रस्त्यावर पडल्यानंतर होणारा कडऽऽ कडऽऽ आवाज मन अस्वस्थ करत होता. झाडांची तोड जवळच असलेल्या नागांवमध्ये सुरू होती.गावातली बरीचशी कुटुंब रस्त्याकडेला आपआपल्या शेतात राहत होती. असंच जिजाआक्काच कुटुंब रस्त्याकडेला स्थिरावलेलं. जिजाक्का साठ वर्षांपूर्वी इथं नांदायला... Continue Reading →

श्रावण

तूफान कोसळणारा कोकणातला पाऊस. कडेकपरीतुन ओसंडून वाहणारे धबधबे आणि श्रावणाच्या आगमनाने हिरवागार झालेला निसर्ग. तुषारला पाऊस खूप आवडायचा. मुंबईच्या प्रचंड घामट हवेत पावसाची चाहूल लागली की हा प्रचंड खुश व्हायचा. एका मोठया मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करून चांगलं मोठं पॅकेज घेणारा तुषार एरवी वर्षभर कधीच सुट्टी घ्यायचा नाही, पण पावसाळा सुरू झाला की वरचेवर... Continue Reading →

हळदीकुंकू

दरवर्षी चातुर्मास आला की छोटीशी यात्रा भरायची. तो उत्साह वर्णनातीत असायचा. दिवसभर फराळाची रेलचेल असायची. करत करत सुमी थकून जायची; पण ते सगळे ती मनापासून करायची. हळूच हसरा, नाचरा, जरासा लाजरा असा श्रावण यायचा. त्याच्या रिमझिम बरसातीत सुमी चिंब भिजलेली असायची. अशाच एका श्रावणमासी तिच्या जीवनवेलीवर प्रेमतुषारांचे सिंचन करत हर्षद आला होता.भादवा आला की सुमी... Continue Reading →

मर्म जीवनाचे

काही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाने 'तनिष्का हायटेक नर्सरी' या नावाने नर्सरी सुरू केली, पण मी नोकरीनिमित्त रायगडला असल्याने बरेच दिवस नर्सरी पाहण्याचा योग आला नाही. उन्हाळ्याची मे महिन्याची सुटी लागली आणि मी गावाला आलो, एक दिवस आवर्जून नर्सरी पाहायला गेलो. मोठा भाऊ राहुल कार्यालयात कामात होता. मला पाहताच म्हटला," प्रॉडक्शन मॅनेजर जरा कामानिमित्त बाहेर गेलेले... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया