व्हेंटिलेटर

रात्री अडीच वाजता दारावरची बेल सारखी सारखी वाजल्याने काहीशा त्रासिक स्वरात मारिया उठली, कारण ती व कुंजा ( कुंजात्ता ) बारा वाजता हॉस्पिटल मधून सेंकड शिफ्ट करून घरी परतल्या होत्या. तर कार्तिकी व रिया ह्या नाईटशिफ्ट साठी हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या. दारात शेजारील फ्लॅट मधील देसाई काकू काहीशा काळजीच्या स्वरात बोलल्या…."मारिया सिस्टर… रेवतीला खूप त्रास... Continue Reading →

हा माझा मार्ग एकला

बाकीच्या शिष्यमंडळींसोबत भानूदास पण चालत होता, चालता चालता त्याला ओळखीचं गाव दिसलं. खरंतर या गावात त्याला अजिबात जायचं नव्हतं, बाकीच्या शिष्यबंधूंना त्यांनी तसं सांगून पण पाहिलं, पण त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं जाताना त्या गावातून जाणं गरजेचंच होतं, दुसरा मार्ग नव्हता. अखेर नाईलाजाने तो त्या गावात शिरला.गावात शिरताच त्याला सर्व आठवणी आल्या. दुपारी जेवणाची... Continue Reading →

करार

     आजचा दिवस माझ्यासाठी अर्थात प्रसिद्ध लेखिका केतकीच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात यावा असाच खरंच खास दिवस. एका अलिखित करारानुसार मी दारिद्र्याच्या गलिच्छ नाल्यातून सोय़ीस्करपणे अलगद बाहेर आले.व्यवहारी जगात गरीबांना आपल्या मनातील भावनांना तिलांजली द्यावी लागते.गरिबीतील ते जगणं केवळ जीव जगवण.....माझा नाल्यातून जीवन प्रवास..... तिथूनच नदीला कडकडून भेटले. शेवटच्या टप्प्यात अथांग सागराची ओढ होतीच...पोहोचले... Continue Reading →

श्रावण

तूफान कोसळणारा कोकणातला पाऊस. कडेकपरीतुन ओसंडून वाहणारे धबधबे आणि श्रावणाच्या आगमनाने हिरवागार झालेला निसर्ग. तुषारला पाऊस खूप आवडायचा. मुंबईच्या प्रचंड घामट हवेत पावसाची चाहूल लागली की हा प्रचंड खुश व्हायचा. एका मोठया मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करून चांगलं मोठं पॅकेज घेणारा तुषार एरवी वर्षभर कधीच सुट्टी घ्यायचा नाही, पण पावसाळा सुरू झाला की वरचेवर... Continue Reading →

संध्या आयुष्याची

 पावसाची रिपरिप चालू होती पण अचानक वाढली. छत्री होती हातात..  पण जरा जोरातच पाऊस आला म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्र्याच्या शेड च्या आडोशाला थांबलो... छत्री मिटवली. छत्री घेऊन सुध्दा थोडं डोकं भिजलं होतं.. तसं मी डोकं हाताने झाडाले. केसातलं पाण्याचं तुषार उडालं. तिन्ही सांज झाली होती. चिलटं चावत होती. त्यामुळे पावसाचं सर्वाट कमी आल्या... Continue Reading →

ऋण

अंगदनं यादीवरून शेवटची नजर फिरवली. "केतकर सर, मराठे सर, गारे सर... हम्म आपले आवडते शिक्षक. कोरांटे सर...काटे सर, पंडीत मॅडम, लोहार मॅडम आणि कावळे मॅडम.. आहेत. काटकर सर, बारवे सर तुम्हाला फुली...तुम्ही या मेळाव्यात यायचं नाही!!! "अजित आणि प्रशांत त्याच्याकडं पहात होते. त्याच्या डोळ्यातला खुनशीपणा चमकत होता.   "अंग्या.." अजित म्हणाला," आपण आपल्या बॅचचा स्नेहमेळावा करतो... Continue Reading →

स्मृतिगंध

       आज महाविद्यालयात जाण्यास जरा जास्तच उशीर झाला होता. सकाळची पावणे नऊची बस सुटली आणि वेळेचं सगळं गणितच चुकलं. निशा तिच्या मैत्रीणींसोबत घाईघाईने बसमधून उतरली. गडबडीत तिची ओढणी बसच्या दाराला अडकली. ओढणी कशीबशी सोडवून ती पुढे निघाली. इतक्यात एका मुलाने तिचे पाय धरले. त्याचे वय जेमतेम दहा वर्षाचे असेल. अचानक घडलेल्या या प्रकाराने... Continue Reading →

मम्मी, तुस्सी ग्रेट हो !

निशा मैत्रिणीसोबत व्हाटसअॅपवर चॅटिंग करण्यात मग्न असतानाच तिच्या मम्मीन 'निशू s' म्हणून हाक मारली अन् ती 'आले गं' म्हणीत तडक किचनमध्ये आली. तिनं विचारलं, "आवरलं का गं तुझं, मम्मी?" "झालंच हं दोन मिनटात.. तुझंच काही राहिलं असेल तर बघ.. "डब्बा भरीत मम्मी म्हणाली. "माझं आवरलंय सगळं मघाशीच.. चल पटकन, ऊन चटकत आहे .." "हो, झालंच... Continue Reading →

संवाद

"खरंच माझी आई पण काँलेजमधे जाणार का टिचर?...मी सांभाळेन लहान भावंडाना, संध्याकाळचा स्वयंपाक पण करेन टिचर... आईला नक्की काँलेजमधे शिकवा..." बारा वर्षांच्या अंशुचा उत्साह बघुन मुनासोबत टिचरचेही डोळे भरुन आले. पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतातुन कुटुंबासोबत तिशीतली मुना पुण्यात रहायला आली होती. शिक्षण काहीच नव्हतं. नवरा बांधकामावर मजुर, सहा मुलं, साधारण 3 वर्षे ते 12 वर्षे वयाची.... Continue Reading →

व्यथा

 "अवं बाई घ्या की कायतरी माझ्याकडनं! आज सकाळपासनं भवानी बी झाली नाही. दोन लहानग्यांना काय दिऊ खायाला?" भाजी विकणारी रखमा भाजीची टोपली डोक्यावर वागवत भाजी विकत होती."चीनमधनं ह्यो करूना का काय रोग आला नं माझ्या धंद्याला टाळं लागलं.कोण बी भाजी घीना झालंय. काय खावावं गरीबानं". "ही मोठी माणसं नियम काढत्यात आन आमा गरीबाच्या पोटावर पाय!... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया