माधवराव

आपल्या दैनंदिन व्यवहारात नात्यात लग्नसमारंभात अनेक नमुन्याचे मित्र भेटतात पैकी काही लक्षात राहतात काही प्रसंगाने आठवतात.आज सकाळ पासून माधवरावांनी डोकं उठवलं होत. कितीही प्रयत्न केले तरी ते माझा पिच्छा सोडत नव्हते.तसं मी माधवरावाना कधी भेटलो नव्हतो नुसत भेटलो नव्हतो असं नाही तर अशा व्यक्तीला पाहिलं सुध्दा नव्हतं तरी या माधवरावानी माझ्या जीवनात प्रवेश नव्हे तर... Continue Reading →

गंध मैत्रीचा

घाडगे आजोबा रोज सकाळी पूजेसाठी परसबागेतील फुलं काढायचे. मुखी हरिनाम आणि दुसरीकडे पटापट फुलं काढून तबकात ठेवायचे. रंगीबेरंगी, नाजूक अशी उमललेली टवटवीत फुलं पाहूनच कसं तजेलदार वाटायचं. आजोबा रोज फुलं काढून त्यांच्यावर पाण्याचा हबका मारून ठेवायचे आणि थोड्या वेळाने पूजा करायचे. पण त्या दिवशी काही तरी वेगळं घडलं. काय झालं कळायला काहीच मार्ग नव्हता. पण... Continue Reading →

पुनर्जन्म

 आज सेंट्रल पार्क मध्ये एका कलाकाराच्या पेंटिग्स चं एग्झिबीशन भरलं हाेतं. "रेवाही आपल्या ५ वर्षाच्या मुलीला रुताला घेऊन पेंटिग्स बघायला आली" हाेती. एकापेक्षा एक सुंदर सुंदर चित्र हाेती तिथे पण "रेवाची "नजर एका पेंटिंग वर स्थिर झाली. एक साधा ड्रेस परिधान केलेली तरुणी, तिच्या समाेर एक लाल कुडता घातलेल्या तरूणाच्या कपाळाला  "ती" कुंकू लावतेय असं... Continue Reading →

धनी

गुहागर-विजापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरवात झाली होती. शेकडो वर्षांपासून मायेची सावली देणार्‍या मोठ-मोठ्या वडांच्या झाडांची जणू कत्तलच सुरू होती. मुळापासून तोडलेले झाड रस्त्यावर पडल्यानंतर होणारा कडऽऽ कडऽऽ आवाज मन अस्वस्थ करत होता. झाडांची तोड जवळच असलेल्या नागांवमध्ये सुरू होती.गावातली बरीचशी कुटुंब रस्त्याकडेला आपआपल्या शेतात राहत होती. असंच जिजाआक्काच कुटुंब रस्त्याकडेला स्थिरावलेलं. जिजाक्का साठ वर्षांपूर्वी इथं नांदायला... Continue Reading →

एम्प्लॉयीं

आपण लिहीलेल्या मोडक्या तोडक्या कवितांवर भाळून कुणी चक्क आपल्याला भेटायला बोलावेल ही कल्पनाही जयंतीच्या मनात नव्हती. फेसबुकवर किती कमी फॉलोअर्स होते तिचे. खुद्द तिलाही माहीती होतं ज्याला सकस म्हणावं असं आपलं लिखाण नाही. साली उज्वला होती...तिला तो बरोबर सेन्स होता...कोणते शब्द कसे बसवायचे.. कोणत्या शब्दाने काव्य भारदस्त वाटेल... आपण तर काय करत होतो सरळ सरळ... Continue Reading →

शिवापूरम्म्ं

प्रवास रात्रीचा करायचा नाही असे ठरलेले होते, पण वस्तीचे ठिकाण फक्त दीड तासाच्या अंतरावर होते म्हणून राज म्हणाले,"पोहोचू लवकरच"तसा सर्वांनी होकार दिला, पण त्यांच्या या निर्णयाने मी थोडी नाराज झाले, जेवण करून प्रवास सुरू झाला. राज स्वतः ड्राईव्ह करत होते, त्यांचे मित्र सागर भाऊजी, त्यांची पत्नी व मुलीसह मधल्या सीटवर बसले होते आणि निखिल भाऊ... Continue Reading →

लगाम

यशराज शंकर आचरेकर कोलगेट, साबण, तेलाची बाटली आणि अनुने सांगितलं तसा नवीन लायटर. चार तर गोष्टी, पण तरी मी पुन्हा एकदा सामानाची पिशवी नीट चेक करतो. काउंटरला माझ्यापुढे दोघेच जण. पाच मिनिटात येईल आपला नंबर.मी कॅशिअरच्या पुढ्यात सगळं सामान नीट मांडून ठेवतो.किती वेळ झाला आणि हा अजून खाली मान घालून आकडेमोडच करतोय. एकतर एवढं उकडतंय... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया