एक फुल, चार हाप

पुण्याच्या एस.टी. बसस्थानकावरून शिरूरकडे बस धावू लागली.बस माणसांनी खचाखच भरली होती.शहरातून काही खरेदी करून माणसे गावाकडे चालली असल्यानं एस.टी.बसमध्ये अधूनमधून काही बोचकी,पिशव्या,काही खोकी मांडून माणसं विसावली होती.उभे राहून प्रवास करणारे मात्र राजेशाही थाटात आसनस्थ झालेल्या व्यक्तिकडे बघून उगाचच नाक - डोळे मोडीत होते.अशा उभ्या राहिलेल्या प्रवाशांमध्ये सुमारे सत्तर - पंच्चाहत्तरच्या वयाचा टप्पा पार केलेली एक... Continue Reading →

स्वामीनिष्ठा

एक छोटेसे खेडेगाव असते." रुकडी' त्याचे नाव "कोल्हापूर'" जिल्हा. खेडेगाव म्हणजे अगदी खेडेगाव. तिथे हातावर मोजण्या इतपत ब्राह्मणांची घरे होते. बाकी सर्व बाराबलुतेदार. सर्वजण सुखाने नांदत होती. अजून तरी सर्वांच्यात एकी होती. लांड्यालबाड्या नव्हत्या. म्हणूनच सर्वजण वेगवेगळे असूनही एकत्र सुखाने नांदत होते.इथे एक बापूराव रुकडीकर म्हणून सावकार राहत होते. ते सावकारकी  करायचे म्हणून सावकार नाव पडले.... Continue Reading →

मूठ माती

ओबड-धोबड खाचखळग्याचा रस्ता कापत गाडी पुढे धावत व्हंती. गाडीत निपचिप शरीराचीवळकुंडी करून पडलेल्या पमानं डोळे गच्च मिटले असले तरी गाडीच्या प्रत्येक गचक्यासरशी तिच्या आयुष्यातला एक एक गचका त्या गाडी सारखाच डोळ्यासमोर हेलकावे घीत व्हंता. खड्ड्यांनीच भरलेल्या आपल्या आयुष्याचा रस्ता आता तुडवायला नकं झालंय… पण ही माणसं का घीऊन चालले असतील? जगानं अव्हेरलेल्या जीवाला जवळ करणारी... Continue Reading →

मुडदा

     दत्ता, प्रकाश आणि सुलभा वडिलांना आण्णा म्हणायचे. पितृपंधरवडा सुरु असल्याने आण्णा गावातील सर्वांचे आमंत्रण बेतवायचे. जमलं तर घरी यायचे नायतर तिथंच टापा हाणीत मुक्काम ठोकायचे. मात्र हा त्यांचा बेफिकीरपणा घरच्यांना चांगलाच नडला.       नवमीच्या दिवशी आण्णा लेकीकडे निघाले. लांबून गाडीनं वळसा घालुन जाण्यापेक्षा एवढं टेकाड पालथं घातलं की दऱ्यात पहिल्यांदा लेकीचंच घर... Continue Reading →

स्मृतिगंध

       आज महाविद्यालयात जाण्यास जरा जास्तच उशीर झाला होता. सकाळची पावणे नऊची बस सुटली आणि वेळेचं सगळं गणितच चुकलं. निशा तिच्या मैत्रीणींसोबत घाईघाईने बसमधून उतरली. गडबडीत तिची ओढणी बसच्या दाराला अडकली. ओढणी कशीबशी सोडवून ती पुढे निघाली. इतक्यात एका मुलाने तिचे पाय धरले. त्याचे वय जेमतेम दहा वर्षाचे असेल. अचानक घडलेल्या या प्रकाराने... Continue Reading →

मम्मी, तुस्सी ग्रेट हो !

निशा मैत्रिणीसोबत व्हाटसअॅपवर चॅटिंग करण्यात मग्न असतानाच तिच्या मम्मीन 'निशू s' म्हणून हाक मारली अन् ती 'आले गं' म्हणीत तडक किचनमध्ये आली. तिनं विचारलं, "आवरलं का गं तुझं, मम्मी?" "झालंच हं दोन मिनटात.. तुझंच काही राहिलं असेल तर बघ.. "डब्बा भरीत मम्मी म्हणाली. "माझं आवरलंय सगळं मघाशीच.. चल पटकन, ऊन चटकत आहे .." "हो, झालंच... Continue Reading →

आबामास्तरांचे प्रेमकाव्य

सकाळी सहा वाजताच आबा मास्तरांचा फोन आला. अरे तुमच्या त्या काव्यमैफलीला आलो अन् सगळा घोळ होऊन बसला. कुठून बुद्धी झाली. नको त्या संकटात अडकलो बघ. तू ताबडतोब मला देवळाच्या पारावर भेट. कालपासून मी घर सोडलंय.मी मात्र विचारात पडलो. काव्य मैफलीचा आणि घर साडण्याचा काय संबंध, पण आबामास्तरांचा खोल गेलेला आवाज ऐकून मला त्यांची चिंता वाटू... Continue Reading →

रम्याची गोष्ट

…पाचवा तास सुरु झाल्याचा टोल पडला अन् सावळ्या रंगाचे व हसऱ्या चेहऱ्याचे माने सर वर्गात आले. सारी मुलं उठून उभी राहिली अन् त्यांनी सरांना ' गुड मॉर्निंग ' केलं. सरांनीही 'लगुड मॉर्निंग,सीट डाऊन' म्हणताच सारी मुलं खाली बसली. सरांनी हातातलं पुस्तक टेबलावर ठेवलं अन् डाव्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या रम्याकडं बघितलं तर सावळ्या रंगाचा अन् थोडासा... Continue Reading →

मर्म जीवनाचे

काही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाने 'तनिष्का हायटेक नर्सरी' या नावाने नर्सरी सुरू केली, पण मी नोकरीनिमित्त रायगडला असल्याने बरेच दिवस नर्सरी पाहण्याचा योग आला नाही. उन्हाळ्याची मे महिन्याची सुटी लागली आणि मी गावाला आलो, एक दिवस आवर्जून नर्सरी पाहायला गेलो. मोठा भाऊ राहुल कार्यालयात कामात होता. मला पाहताच म्हटला," प्रॉडक्शन मॅनेजर जरा कामानिमित्त बाहेर गेलेले... Continue Reading →

माळावरची फुलं

दिनेश भाऊराव भोसले  घंटा खणाणली. गावच्या वेशीपर्यंत आवाज घुमला. राजानं पाठीवर दप्तर टाकलं. अंगणातल्या बकरीला गोंजारलं अन् झप झप पावलं टाकत निघाला. तेवढ्यात त्याच्या मागनं धापा टाकत रोह्यत्या आला. राजाच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला,  “आज बी उशीर ?”  राजानं मान वाकडी केली, म्हणाला, “मनच लागंना बघ या साळंत.”  “अॅ हॅ ... मंजी टकलू बोलत व्हता त्ये... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया