माधवराव

आपल्या दैनंदिन व्यवहारात नात्यात लग्नसमारंभात अनेक नमुन्याचे मित्र भेटतात पैकी काही लक्षात राहतात काही प्रसंगाने आठवतात.
आज सकाळ पासून माधवरावांनी डोकं उठवलं होत. कितीही प्रयत्न केले तरी ते माझा पिच्छा सोडत नव्हते.
तसं मी माधवरावाना कधी भेटलो नव्हतो नुसत भेटलो नव्हतो असं नाही तर अशा व्यक्तीला पाहिलं सुध्दा नव्हतं तरी या माधवरावानी माझ्या जीवनात प्रवेश नव्हे तर ठाणं मांडून बसले होते.
नोकरी करत असताना काही कामाच्या निमित्ताने श्रीधरशी ओळख झाली. कोणाच्या प्रवेशाच्या निमित्ताने की लग्न जुळवायच्या निमित्ताने ओळख झाली ते निमित्तसुध्दा लक्षात नाही पण श्रीधरचे माझ्या कडे येणेजाणै चालू आहे।आणि ही ओळख माझ्या कार्यालयात सर्वाना माहित झाली आहे. श्रीधर मला भेटायला आला की कार्यालयात सर्वांच्या चर्चेचा विषय होतो. मला संदेश मिळतो तुमचे मित्र आले बरका.माधवराव की जय!
तर हा श्रीधर जोशी काही कामाच्या निमित्ताने झालेली ओळख कायम ठेवली आहे. अंगावर पांढरा शर्ट. कधीकाळी पांढरा असावा अशी ओळख दाखविणारा अनेक वेळा धुण्यामुळे येणार्या पांढऱ्या रंगाचा शर्ट. शर्टला मँचींग पांढरा पायजमा डोक्याला दिवाळीच्या दिवसात लावलेले तेल आता ओळख दाखवित नसल्याने विस्फारलेले केस डाव्या हातात एक जीव झालेली छोटीशी पांढरी पिशवी पायातील चेपल्या किती वेळा दुरुस्त केल्या हे त्या मोचीगारालाच माहीत. अशा पोशाखातील पोस्टातील कर्मचारी म्हणजे श्रीधर जोशी मला भेटायला आला होता.
श्रीधर गेली तीन चार वर्षे माझ्या कार्यालयात येऊन भेटत असतो. घरी कधी आल्याचे आठवत नाही. त्याच्या जवळ एक लहानशी पांढरी पिशवी कायम असते.त्या पिशवीत एवढे काय ठेवलं आहे ते. श्रीलाच माहिती त्याला श्रीधर ऐवजी पिशवीधर म्हणायला हवे आणि तो भेटल्यावर एकदा. विचारले तर म्हणाला की वाटेत देव भेटला आणि म्हणाला श्रीधर पिशवीधर हे भाग्य तुला दिले आहे ते पिशवीतून घेऊन जा. त्यावेळेस आपल्या जवळ पिशवी नसेल तर घरी जाताना सांडत जाईल ना. त्याला दोन्ही हातानी नमस्कार केला. तसच खरं म्हटलं तर नवीन सांगण्यासारख काही नसत म्हणून सांगता येण्यासारखी एकच गोष्ट दरवेळी सांगत असतो.
.आपले माधवराव कँप्टन झाले बर का. आपल्या पांढऱ्या पिशवीतून बर्याच वर्षापूर्वी. काढलेले फोटो दाखवून म्हणतात हा पहा तुमचा विद्यार्थी.त्यावेळी तो बोर्डात आला. होता. आता माधवराव कँप्टन झाले आहेत. ते आपल्या मुलाला माधवराव म्हणून संबोधतात.. माधवरावांचा. मा.राष्ट्पतीच्या हस्ते सत्कार झाला हे पहा राष्ट्रपती माधवरावांचा सत्कार करताना… काही स्पष्ट दिसत नव्हते आणि मी कधी पेशव्यांच्या माधवरावा व्यतिरिक्त अनेक माधव पाहिले आहेत।ते पुढे म्हणाले सरकारने माधवरावांना दिल्लीत बंगला दिला आहे. तो मा.राष्ट्रपतींच्या बंगल्याजवळच आहे
श्रीधर माझ्याकडे आला की आँफिसमधीँल सहकारी गोळा होतात त्यांनाही गंमत वाटते. एक जण विचारतो माधवरावांचे लाडू केव्हा देणार. माधवराव आले की देऊया साहेबांनी.. माझ्या कडे बोट दाखवत.. यांनी एक मुलगी सुचविली आहे. वैजयंती मालासारखी आहे.. अशा तासभर गप्पा मारून जात.
चार पाच महिने गेले. आफिसमधले सहकारी विचारत अलीकडे माधवरावांचा फेरा आला नाही आणि योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी माधवराव हजर!आल्या आल्या जवळच्या खुर्चीवर बसले आणि खाजगी आवाजात म्हणाले माधवरावांनी दिल्लीला लग्न केले. त्यांच्याच आँफिसात आहे. अगदी हेमामालिनी आहे. मी म्हणालो की बर झाले ना!.श्रीधर म्हणाला मला पटतंय हो.पण घरातल्या सासूला पटलं पाहिजे ना. पण एक चांगली गोष्ट झाली मा.राष्ट्रपती रिसेप्शनला आले होते. त्यांनी एक अस्पष्टसा.फोटो दाखविला. मी विचारले तुम्ही का नाही लग्नाला गेलात.माधवरावांनी बोलावलं होत पण रजा मिळायला हवी ना. त्यांनी माझ्या सहकार्याना पेढे वाटले.
एका रविवारी मंडईत श्रीधर भेटला. खुशीत दिसला. तो.म्हणाला एक चांगली बातमी आहे।मी विचारले आजोबा झालास का?तसं नाही त्याच आता फ्रंट वर पोस्टींग झालयं।माधवराव खुश आहेत।मी विचारले सूनबाई कोठे आहेत।ती दिल्लीला आहे. ती नोकरी करते ना. .गडबडीत दिसला…हाँटेल मधे माझ्यासोबत चहा पिऊन गेला. तो फक्त माझा मित्र नव्हता तर माझ्या आँफिसातील सर्वांना त्याच्या बद्दल उत्सुकता असायची. दोन तीन महिन्यात दिसला नाही तर ते चौकशी करीत ते विचारत असत अलिकडे माधवराव आले नाहीत वाटतं।वास्तविक माधवराव हे माझ्या मित्राच्या मुलाचे नाव होते. पण तो कधीच न भेटूनही त्याचीच चर्चा व्हायची. याला काय म्हणतात मला माहिती नाही. पण असं घडायचं खरं.
वास्तविक तो माझ्या आयुष्यात आलेला एकटाच नव्हता. पूर्वी याच माणसाची इतकी आठवण यायची की नको ती आठवण असे व्हायचे.
आता मात्र मला त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता वर्षांनंतर कमी झाली होत कारण अचानक पूर्वी झालेली जखम उघडी होऊन त्यातून रक्त भळाभळा वाहू लागावे तसे झाले.
एके दिवशी मी आँफिस सुटल्यावर गाडीवरून जात होतो. त्याच वेळी माधवराव तथा माझा तथाकथित मित्र ़जवळून जात होता.त्याने मला पाहिले होते पण त्याला थांबण्याची आवश्यकता वाटली नसावी. तो अचानक गायब झाला होता.असं काही झालं की मला अस्वस्थ व्हायला होतं त्याच मूळ कारण शोधून काढण्यासाठी त्याच्या आँफिसात जायचे असे मनात ठरवलं टाकलं।
.असा नकारात्मक विचार करण्याऐवजी असा विचार का नाही करावा. माधवरावाना आता मुलगा झाला असेल. तो दिल्लीत इंग्रजी मिडीयम मधे शिकत असेल।.राष्ट्रपती त्याला रोज सकाळ संध्याकाळ भेटत असतील. हाय.ह्ँलो करत असतील. माधवरावांचे आईवडील माधवरावांकडे दिल्लीला गेले असतील. राष्ट्रपतींच्या बरोबर माझ्या मित्राने फोटो काढला असेल ते माझ्या आँफिसात आल्यावर सर्वांना तो फोटो दाखवतील असा विचार करत होतो.
मनाशी ठरवल्याप्रमाणे मित्रांला भेटायला त्याच्या आँफिसात गेलो।तेथील शिपायाला विचारले .श्रीधर जोशी केव्हा भेटतील. हा प्रश्न विचारताच हसायला लागला.तो म्हणाला थोडा वेळ थांबा आमचे साहेब येतील तेच तुम्हाला सांगतील.आज मोकळा वेळ काढून आलो होतो. साहेबांना मित्रांला भेटूनच जायचे असा विचार करून आलो होतो.
जरा वेळाने साहेब आले. म्हणाले काय काम काढले आहे. त्यांना विचारले श्रीधर जोशी आपल्याच आँफिसात आहेत ना.ते म्हणाले बरोबर पण आता या आँफिसात नाहीत.मी विचारले त्यांची बदली झाली काय?
हा प्रश्न ऐकून ते जरा गंभीर झाल्यासारखे वाटले. त्यांनी मला विचारले तुम्ही त्यांचे मित्र आहात ना.मी म्हणालो माधवराव!माझे बोलणे थांबवत म्हणाले. आलं सर्व लक्षात आलं.
आणि सर्व व्रुत्तांत कथन केला. त्याचा सारांश असा.त्यांचा मुलगा माधव कशाला आपणही माधवराव म्हणू या. तर माधवराव लहानपणापासून हुशार होते. दहावी बारावी परीक्षेत बोर्डात चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. त्याच्या वडिलांनाही वाटलं आपला मुलगाही चमकेल.त्याला चांगल्या क्लासमधे घातले. ईर्षा वाढत गेली. आणि चांगले मार्क मिळविण्यासाठी इतर मार्गाचाही उपयोग केला. आणि कायद्याच्या कचाट्यात अडकला.दोन वर्षे परीक्षेत बसण्यास मनाई आली आणि पुढील सर्व ईमारत पत्यासारखी कोसळली.माधवरावांची दोन वर्षे नाही तर आयुष्य धुळीस मिळाले.शिक्षण थांबले. माधवरावांच्या डोक्यावर परिणाम झाला. कामात चुका होऊ लागल्या। त्यामुळे सरकारी नोकरी गमवावी लागली. त्यांना काही तरी मदत म्हणून रोजंदारीवर नेमण्यात आले. माधवरावांची जहागिरी गेल्याने ते मिळेल तेथे चाकरी करू लागले मी विचारले आता माधवराव कोठे असतात. मी त्यांना कधी भेटलो नाही. साहेबांनी शिपायाला चहा आणायला सांगितले. मी म्हणालो आता चहा कशाला. साहेब म्हणाले माधवरावांना भेटायचे आहे ना.मग चहा घ्यावाच लागेल.
जरा वेळाने चहा आला. साहेब त्या चहा आणलेल्या मुलाला म्हणाले काय माधवराव लग्न करायचे ना.तो केवीलवाणे हसला.बायको कशी हवी वैजयंती माला ना! आणि माझे डोळे भरुन आले

अरविंद लिमये

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: