पुनर्जन्म

 आज सेंट्रल पार्क मध्ये एका कलाकाराच्या पेंटिग्स चं एग्झिबीशन भरलं हाेतं. “रेवाही आपल्या ५ वर्षाच्या मुलीला रुताला घेऊन पेंटिग्स बघायला आली” हाेती. एकापेक्षा एक सुंदर सुंदर चित्र हाेती तिथे पण “रेवाची “नजर एका पेंटिंग वर स्थिर झाली. एक साधा ड्रेस परिधान केलेली तरुणी, तिच्या समाेर एक लाल कुडता घातलेल्या तरूणाच्या कपाळाला  “ती” कुंकू लावतेय असं त्या पेंटिंगमध्ये रेखाटलेलं हाेत. त्या तरूणीच्या चेहऱ्यावरचं हलकं स्मित रेवाला स्वःतचं वाटतं हाेत, तिच्या हातातील कुंकवाचा करंडाही कुठेतरी पाहिल्यासारखा तिला वाटतं हाेता. आणि  ताे तरूण त्या तरूणीच्या नजरेवर स्थिरावलेला त्याचे ते बाेलके डाेळे त्याचा ताे विलक्षण तेजस्वी चेहरा आणि त्याचा एक हात केस मागे करण्याच्या पाेज मधला हे सर्व तिला आपल्याच कडे ताे बघताेय असा भास हाेऊ लागला. तेवढ्यात रूता कंटाळून रडू लागली तिच्या रडण्याने रेवा भानावर आली आणि मनात नसताना तिथुन निघाली.                                  

घरी आल्यावरही “रेवाच्या” डाेळ्यासमाेरून ते पेंटिंग काही केल्या जात नव्हतं. आज “ती” घरातील कामेही यंञवत करतं हाेती, रूताही खेळण्यात रमली हाेती. तेव्हढ्यात ‘डाेअरबेल’ वाजली “गंधार आला वाटतं” असं म्हणून तिने दरवाजा उघडला पण ‘ती’ आज त्याच्याकडे बघून प्रसन्न हसलीच नाही. गंधार क्षणभर स्तब्ध झाला आणि आत आला कारण असं पहिल्यांदाच घडतं हाेतं. “गंधार रेवाचा नवरा आणि एक चांगला मानसाेपचारतज्ञ हाेता. जबाबदार केअरिंग प्रेमळ हाेता त्याचं रेवावर प्रचंड प्रेम हाेतं ताे “अनाथ” असल्याने त्याला रेवा शिवाय कुणीचं नव्हतं. त्या दाेघांचं लव्हमँरेज झालेलं. रेवाची सगळ्यात जवळच्या मैञिणीला प्रेमभंगामुळे फार माेठा धक्का बसला हाेता. पण गंधारच्या कंन्सलटन्सी मुळे ती पुर्णपणे बरी झाली त्यामुळे रेवा व गंधार ऐकमेकांना ओळखु लागले, प्रेमात पडले आणि लग्न झालं. लग्नाला आता ६ वर्ष झाली हाेती.. दाेघांच्या आयुष्यात रूता आली गंधारची तर ती जीव की प्राण हाेती. दाेघींवर भरभरून प्रेम करायचा गंधार आणि रेवाही गंधार ला खुप सांभाळायची दाेघांचं ऐकमेकांवर खुप प्रेम.. त्यामुळे रेवाचा आजचा पडलेला चेहरा गंधारला ञस्त करत हाेता. जेवतानाही रेवाचं अजिबात लक्ष नव्हतं न राहावून गंधार ने विचारलंच शेवटी “रेवा काय झालं गं आल्यापासून बघताेय मी तु खुप डिस्टर्ब वाटतेयसं माझं काही चुकलं का गं? त्याच्या त्या हळुवार शब्दांनी रेवाला खुप रडू आलं ती त्याच्या मिठित शिरून ओक्साबाेक्सी रडत हाेती गंधारही तिला माेकळं हाेऊ देत हाेता. पण इतकं हळवं हाेताना गंधार तिला पहिल्यांदाच बघत हाेता.                                      

रूता झाेपून गेली. मग रेवाने पेंटिंगचा तिच्यासाेबत घडलेला प्रकार सांगितला. “गंधार तुला हे सर्व विचिञ वाटत असेल पण खरचं असचं घडलं आणि अजूनपण ते चिञ हलतं नाहीये डाेळ्यासमाेरून”. “रेवा अगं मी कितीतरी ‘मनाेरुग्णाना’ हाताळताे मी त्यानाही कधी याची जाणीव करून देत नाही कि ते वागतायतं ते विचिञ आहे तर तु तर माझा जीव आहेस ना?” “मला असं काही वाटतं नाही हां तु तुला जे वाटतं ते सांग मला.” आणि मी उद्याचं त्या पेंटर ला शाेधून काढताे कारण तु अशी अस्वस्थ असलीस कि मला कासाविस व्हायला हाेतं ना गं.. झाेप बघू आता शांत. रेवाने प्रेमळ नजरेने गंधारकडे पाहिलं आणि त्याच्या कुशीत  शिरली.. गंधार तिला खुप वेळ थाेपटतं राहिला. 

                  “हँलाे मी डॉक्टर गंधार बाेलताेय अनुराग देसाई आपणचं ना?.. हाे बाेलताेय बाेला काय काम आहे? काल तुमच्या पेंटिग्सचं एग्झिबीशन हाेतं ना सेंट्रलपार्क मध्ये तिथुनचं नंबर मिळवला त्यातलं एक तरूणी तरूणाला कुंकू लावतेय ते पेंटिंग विकलं गेलं का? गंधार म्हणाला. नाही हाे सगळी चिञ विकली गेली पण ते एक राहिलंय. ‘अनुराग म्हणाला, “मग माझ्या मिसेसला खुपचं आवडलयं तुम्ही घरी  येऊन देऊ शकता का? गंधार ने विचारलं. हाे, हाे, येइन कि, पत्ता मेसेज करा मला मी आजचं येताे. अनुराग म्हणाला. करताे पत्ता मेसेज. ओके थँक्यू. फाेन कट झाला.                                    

“डाेअरबेल” वाजली रेवाने दार ऊघडलं.. समाेर घारे डाेळे, उंच गाेरापान तरूण हातात फ्रेम घेऊन उभा हाेता. रेवाला त्याच्या डाेळ्याकडे बघताचं काही आठवल्या सारखं वाटलं.. पटकन स्वःला भानावर आणून तिने विचारलं “काेण आपण”? मी अनुराग देसाई.. डॉक्टर गंधार इथेच राहतात ना? अनुराग ने विचारलं. हाे या ना आत ती म्हणाली. परवाचं पेंटिंग तुम्हाला आवडलं ते घेऊन आलाेय. अनुराग म्हणाला. ओ !  गंधार म्हणाला हाेता तुम्हाला फाेन केलेल्याचं. रेवा म्हणाली. अनुरागलाही रेवा कडे बघितल्यावर वेगळंच काही हाेतयं असं भासलं. त्या दिवशी हे पेंटिंग बघितलं आणि हे माझ्याचं बाबतीत घडलयं असं वाटलं ओ, डाेळ्यासमाेरून जातचं नव्हतं.. रेवा म्हणाली. काय सांगताय काय? व्हॉट अ कॉइन्सिडन्स माझ्या हातून हे पेंटिंग विलक्षण पध्दतीने काढलं गेलयं मी वेगळचं चिञ काढायला बसलाे आणि कसं काय हे चिञ काढलं गेलं हे मलाचं कळलं नाही.. आणि हे सगळ मला माझंचं भासलं. मी हे ठेवणार नव्हताेचं प्रदर्शनात पण माझी मिसेस म्हणाली कि ठेव साे ठेवलं.. अनुराग म्हणाला. आय अँम सॉरी हां मी जरा जास्तचं बाेललाे. नाही हाे मी पण बाेललेचं कि पण, हे तुम्हाला हवं असेल तर राहूदे तुमच्याचकडे रेवा म्हणाली.नाही हे तुमचंच आहे. बर मग काय किंमत याची? काही नकाे कारण तुम्ही जी किंमत केलीय ती काेणचं करणार नाही असं म्हणून ताे जायला निघाला. अरे मी तुम्हाला पाणीही नाही विचारलं रेवा म्हणाली.. नकाे थँक्यु पुन्हा केव्हातरी.पण नक्की या हां पुन्हा केव्हातरी रेवा पटकन बाेलली. येस नक्की अनुरागही नकळत बाेलून गेला. हा सर्व संवाद गंधारने ऐकला त्याला ही केस जरा वेगळीचं वाटली.     

 अनुराग कॉफी पीत बसला हाेता. तेव्हढ्यात सेजल त्याला हाक मारत आली पण अनुरागचं लक्षचं नव्हतं. त्याच्या केसात तिने अलगद हात फिरवला तेव्हा ताे भानावर आला.”अनु काय रे झालयं तुला ? ते पेंटिंग काढल्यापासुन असा काहितरी विचार करतं बसलेला असताेस”. ‘सेजल’ अनुरागची बायकाे इंजिनीयर हाेती आयटी कंपनीत चांगल्या पाेस्टवर जॉब करत हाेती. माेकळ्या विचारांची हाेती ती. अनुराग आणि तिचं लग्न मेट्रिमाेनी साइटवर जुळलेलं हाेतं. “काही नाही गं ज्यांनी हे पेंटिग घेतलं ना? त्यांचा विचार करताेय अगं त्यांना ना त्या पेंटिंगकडे बघून ना हे सर्व त्यांच्या बाबतीत घडलयं असं वाटतयं अनुराग म्हणाला. काय सांगताेयसं वॉव भारीचं रे. यात भारी काय गं सेजु मला ही सेम फिलिंग आहे माहितीय ना तुला.. हाे रे म्हणूनच म्हणतेय रे तुझ्यासारखा विचार करणार आहे कुणीतरी ना? सेजल म्हणाली. सेजु तुला जेलसी वगैरे नाही का वाटतं? जेलसी त्यांना वाटते ज्यांना आपल्या पार्टनरवर विश्वास नसताे.. सेजल म्हणाली. सेजु यार कशी आहेस गं तु. अनुराग म्हणाला, अनु आपण त्याना भेटूया परत एकदा हां..हां मी पण ताेच विचार करताेय.                      

मे आय कमिंग? हां या आत.. गंधार म्हणाला.” मी पेशंट नाहीये हां. आय अँम सेजल देसाई अनुराग ची मिसेस”.सेजल म्हणाली. ” ओ, हाय सेजल मला ही तुम्हाला भेटायचं हाेतचं”. गंधार म्हणाला. मी ना पुनर्जन्माची पुस्तक लहानपणापासून वाचतेय आणि त्या पेंटिंग वरून अनुराग व तुमच्या मिसेसच्या बाबतीत जे घडतयं ते मला असंच काहिसं वाटतयं तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे या गाेष्टींवर तुमचा विश्वास कदाचित नसेलचं. सेजल म्हणाली. “असं काही नाही हां मी पण पुनर्जन्माची पुस्तकं वाचताे. “एखादं अपुर्ण राहिलेलं स्वप्न किंवा अपुर्ण राहिलेलं काम पुर्ण करण्यासाठी पुनर्जन्म हाेताे. मी कधीतरी पेशंटला ह्या पाेंईंट ऑफ व्ह्यु ने बघताे. अभ्यासताेही”.गंधार म्हणाला. काय सांगताय काय?मी असा डॉक्टरही जन्मात नाही पाहिलेले. सेजल म्हणाली. गंधार हसला आणि म्हणाला अहाे सायन्सच्या पुढेही काहितरी आहे, निसर्ग आहे त्याही पुढे देव आहे. मी मानताे हे सगळं. माझ्यासारखा विचार करणारं आहे कुणीतरी. पण काय करायचं ह्या दाेघांचं? सेजल म्हणाली. तुमचा तुमच्या मिस्टरांवर विश्वास.. ताे पुर्ण बाेलणार एवढ्यात ती म्हणाली जर नसता तर इथे आलेच नसते.. डॉक्टर. तसं नव्हे मी विचार करत हाेताे कि त्या दाेघांना नकळत त्या पेंटिंग मधल्या सारखं तयार करून एकमेकांसमाेर आणायचं कदाचित दाेघं काहितरी बाेलून माेकळे हाेतील मग मला कांन्सुलिन करण साेप्प जाईल दाेघांचं. जर पुनर्जन्म असेल तर दाेघांना जाणिव हाेण आवश्यक आहे. पण मेंटली दाेघांना खुप सांभाळाव लागेलं. गंधार म्हणाला. हां चालेल मलाही पटतयं. दाेघही विचार करू लागले.                               

 गंधार तु हा ड्रेस का आणलायस रे? त्या पेंटिंग मध्ये असाचं आहे.रेवा म्हणाली. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हाे गंधार पण मग तुला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचंय ना? हाे. मग ऐक माझं ना. ठिक आहे आता मी काहिही प्रश्न विचारणार नाही.. चल मग हा ड्रेस घाल आणि माझ्यासाेबत. रेवा तयार हाेऊन निघाली. ती त्या पेंटिंग मधल्या तरूणी सारखीचं दिसतं हाेती. गंधारने त्याच्या दवाखान्यात एक रूम पेंटिंग मधल्या सारखी करून ठेवली हाेती. अनुराग ही तसाचं कुडता घालून रेडी झाला हाेता. त्यालाही सेजलने समजावलं.. आणि ताे त्या रुम मध्ये आधीच जाऊन बसला. रेवाही आता आत गेली तिथे तिची नजर त्या करंड्या कडे गेली ताे तिने न्याहाळला आणि हातात घेतला. सेजल आणि गंधार सीसीटीव्ही द्वारे सगळं बघतं हाेते. अनुराग रेवाच्या समाेर आला ती त्याच्याकडे बघत बसली “युवराज तु आज तुझी पहिली मैफिल ना ? कपाळ बघ कसं दिसतयं, थांब हां मी तुला ह्या करंड्यातलं कुंकू लावते”..  अनुरागही त्याच्या नकळत त्या झाेन मध्ये गेलाचं.” कस्तुरी मला भिती वाटतेय गं कसं गाईन गं मी? तु सुंदरच गाणारेस रे माझ्यासमाेर बसलायस असंच आण कि डाेळ्यासमाेर आणि मग बघ कसा गाताेस. बघ कुंकू लावल्यावर किती गाेड दिसताेस आणि कुणाची नजरही नाही लागणार. सेजल आणि गंधारचं म्हणण खरं झालं हाेतं पुर्नजन्माने हे दाेघं पुन्हा एकञ आले हाेते. एवढ्यात रेवा ओरडायला लागली युवराज ! “तुला बघ ना ती लाेक मारायला आलेयत, नका ना मारू माझ्या युवराजला त्याच्याशिवाय कुणी नाही ओ माझं साेडा ना त्याला” आणि रेवा बेशुध्द पडली.. गंधार व सेजल धावतचं रूम मध्ये आले. अनुराग ही त्या झाेन मधून बाहेर पडून नुसताच बसून राहिला हाेता. दाेघांना ही गंधारने वेगवेगळ्या रुम्स मधे झाेपवलं. रेवा झाेपेमधे बडबड करत हाेती “माझ्या राज ला मारलतं तुम्ही आता मी तरी जगून काय करु मी ही जातेय माझ्या राजकडे युवराज येतेय रे मी.. आणि ती घाबरुन जागी झाली” रेवा मी आहे गंधार.. ती त्याला बिलगली मला ना आठवतय काय घडलय ते सर्व गंधार रेवा म्हणाली. असू दे आत्ता झाेप तू शांत अरे रुता कुठेय? तिला तुझ्या आई-बाबांना कडे साेडुन आलाेय मी डाेन्ट वरी झाेप तु. गंधार अनुरागच्या रुम मध्ये जाऊन त्याला ही समजावलं त्याला ही सर्व आठवतं हाेतं. “डॉक्टर मला माझ्याचं वडिलांनी मारुन टाकलं कारण मी एका अनाथ मुलीवर प्रेम करत हाेताे म्हणून”. आत्ता शांत हाे अनुराग हे औषध घे आणि झाेप.. ऊद्या बाेलु…                   

आज रेवा आणि अनुराग भेटणार हाेते. रेवा गंधारला म्हणाली हाेती “गंधार माझ्या पुनर्जन्माची सावली आपल्या संसारावर नकाे रे पडायला मी एकदा अनुरागला भेटायचयं. जा ना मग बिनधास्त. गंधार म्हणाला. इकडे अनुराग ही सेजलला हेच म्हणाला.. आणि ते एका बागेत भेटण्याचं ठरलं. “डॉक्टर! आपण ही तिथे जाऊया का? म्हणजे त्या दिवशी सारखं परत रेवा ला काही झालं तर? सेजल गंधारला म्हणत हाेती.. नकाे. रेवा खुप ब्रेव्ह आहे आता तिला नाही हाेणार काही ती मनाने खंबीर झालीय साे काहीही हाेणार नाही.. आणि अनुरागही माझ्या ट्रिटमेंट मुळे परत बऱ्यापैकी पुर्वस्थितीत आलाय आता ते दाेघेही पुर्नजन्म विसरण्यासाठी भेटतायतं.. गंधार म्हणाला.        हाय! मला उशिर झाला काय? अनुराग म्हणाला. नाही मी ही आत्ताचं आलेय.. त्या दिवशी जे काही घडलं आणि जे काही आपल्या आठवतयं ना त्याचा शेवट करूया.. आपला संसार आहे त्यावर ही सावली पडायला नकाे. रेवा म्हणाली. हाे मी पण हेच म्हणणार हाेताे. रेवा पण माझ्यासाठी तु तेव्हा स्वतःला मारलसं? का गं? त्या जन्मात मला तुझ्याशिवाय काेणीच नव्हतं रे. मी अनाथ हाेते ना.. अनुरागच्या डाेळ्यात पाणी हाेतं. माझी मैफिलही अर्धवट राहिली गं. असं का म्हणताेस ? गंधार म्हणताे की अपुर्ण राहिलेलं काम करण्यासाठी दुसरा जन्म मिळताे. तु तेव्हाही कलाकार हाेतास आजही आहेस तेव्हा सुरांनी बरसायचास तु आणि आज ते तुझेे सूर केनवॉसवर उमटतात नाही का ? रेवा म्हणाली, तुही गंधारच्या तालमीत तयार झालीस गं… दाेघंही हसतात.  रेवा पुढे म्हणाली त्या जन्मी मी अनाथ हाेते या जन्मी माझा नवरा अनाथ आहे त्याचं आयुष्य माझ्यामुळे पुर्ण झालंय या जन्मात.आणि ताे माझ्यावर खुप प्रेम करताे आणि मी पण…हाे गं माझं ही माझ्या बायकाेवर प्रेम आहे आणि तिचंही.. अनुराग म्हणाला. आता त्या जन्मीचं विसरायचा प्रयत्न करू. आणि या जन्मी चे चांगले मिञ हाेऊया. हाे नक्की त्या साठी जी ट्रिटमेंट असेल ती पुरी करेन मी.. अनुराग म्हणाला. दाेघंही एकमेकांकडे पाहून गाेड हसले…                                 

गंधार ! रेवाने हाक मारली..काय म्हणताय बाेला राणीसाहेब.. काय रे म्हणू तुला किती समजुन घेतलसं मला. थँक्स नाही म्हणणार मी पण तुझ्याबद्दलचा आदर कायम मनात असेल माझ्या. रेवा म्हणाली.अगं मी काही वेगळं नाही केलंय खरचं, गंधार म्हणाला. नाही रे दुसरं कुणी असतं तर या पुनर्जन्मावर वगैरे विश्वासच नसता ठेवला आणि संशय घेतला असता ताे वेगळाचं.. रेवा म्हणाली आणि त्याच्या मिठित विसावली.. त्याच्याही डाेळ्यात आज समाधान हाेतं..                                   

अनुराग ही सेजलला थँक्स म्हणत हाेता.. सेजल म्हणाली मी इतकी पुस्तक वाचलीयत पण आपल्याचं बाबतीत असं घडेल असं वाटलंच नव्हतं रे… अनुराग तुला ती हवी असं नाही वाटलं का रेब? सेजल म्हणाली. नाही गं, आणि जरी समजा असा विचार आला तरी तु माझ्या डाेळ्यासमाेर आली असती अनुराग म्हणाला. सेजल धावत येऊन त्याच्या मिठित शिरली…

 राधिका सचिन आठल्ये. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: