अवघा रंग एक झाला

शाम आणि मोहसीन.. दोघंही तिशीच्या आसपासचे..
साठेक वर्षे ह्यांची कुटुंबं एका वाड्यात राहतायत..
पण दोघांमधून विस्तव जात नाही.
मोहसीन वरचेवर मैत्रीचा हात पुढे करायचा. पण केवळ तो मुस्लिम आहे म्हणून शामच्या डोक्यात जायचा.
अधूनमधून वेगवेगळ्या कारणांनी दोघांत खडाजंगी उडायची.
शामच्या बाबांनी शरदरावांनी अनेकदा मोहसीनशी मैत्री करण्याबाबत सुचवलं..पण शामला काही ते जमत नव्हतंच.
आठ दहा दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली होती.गेल्या काही पिढ्यांत शरदरावांच्या घरात वारी काही चुकली नव्हती. ..वारीचा अमाप उत्साह शाम आणि कुटुंबात संचारलेला…भक्तीपूर्ण वातावरण घरात.. . शरदराव गेली पन्नास वर्षं न चुकता वारीला जायचे..पण नुकताच ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेल्याने डाॅ.नी त्यांना परवानगी नाकारली होती.
शरदरावांऐवजी शामने वारी करावी यंदा असं सर्वानुमते ठरलेलं.. पूर्ण वारी राहिली..निदान लोणंदपासून पुढे तरी..शाम एका पायावर तयार झालेला.
तीच धावपळ सुरू होती.

मनात विठ्ठलनामाचा गजर .. तर.डोळ्यांत विठूदर्शनाची आस..
लोणंदमध्ये वारीला घालायचं ठरवून शामने गाडी स्टार्ट केली.
तेवढ्यात मोहसीन समोर…
याचं दर्शन म्हणजे नाट…
शाम वैतागला.
मोहसीनही आपली गाडी काढू लागला..ते पाहून शामच्या मनात विचार आला..कुठेतरी जाऊन ही गाडी धडकलीच पाहिजे..परत याचं तोंड पहायची वेळच येऊ नये आपल्यावर…
तितक्यात त्याची नजर गाडीच्या स्टिअरिंगसमोर ठेवलेल्या सावळ्या विठूच्या मूर्तीवर गेली आणि मनातला वाईट विचार आपसूकच दूर फेकला गेला…

मजलदरमजल करत शामची गाडी जिल्हा सोडून लोणंदच्या दिशेनं भरधाव वेगानं धावत होती..
काही मिनीटांचीच प्रतिक्षा…आपण अण्णामहाराजांच्या दिंडीत पोचणार…
आनंदानं बेभान होऊन नाचणारे वारकरी, अभंग गात न कंटाळता चालणारी म्हातारीकोतारी ..टाळमृदंगाचा खणखणाट..भक्तीरसात चिंब वातावरण..भक्तांचे आणि आराध्याचे अद्वैत.हे सगळं वातावरण त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं …अंगावर शहारे आले त्याच्या..
आणि शामच्या डोळ्यासमोर मिट्ट अंधार दाटला…
जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असलेल्या हाॅस्पिटलच्या आयसीयूमध्ये होता.डोळे उघडताना त्रास होत होता त्याला..डोक्यातून वेदनेची एक लहर उठली आणि ती अंगभर जाणवली..आपण खूप भयंकररित्या जखमी झालो आहोत याची जाणीव त्याला झाली..
परत किती वेळ डोळा लागला याचा त्याला अंदाजच नव्हता…
डाॅक्टरांच्या स्पर्शाने त्याला जाग आली.
तो म्हणाला..”डाॅक्टर, मला आईबाबांना भेटायचंय”
काही क्षणातच त्याचे आईबाबा त्याच्या समोर…
आईच्या डोळ्यात गंगाजमुनेला आलेला पूर ओसरतच नव्हता..बाबा पुन्हापुन्हा देवाला हात जोडत होते…
अडखळत शाम म्हणाला..”आईबाबा..हे काय आणि कसं झालं? मी इथं कसा आलो?”
दोघेही निःशब्द..
डाॅ म्हणाले..”शाम, तुला भयंकर अपघात झाला होता….संध्याकाळची वेळ..पावसाची रिपरिप..निर्मनुष्य रस्ता..त्यावेळी तुझ्या शेजारच्या मित्राने तुला इथं आणलं नसतं तर तू आज भींतीवरच्या फोटोत असतास..
आणि हो..त्यानेच तुला रक्त दिलं बरं का?”
शेजारी? कोण हा माझा मित्र? शाम विचार करू लागला..
कंठभरल्या स्वरात बाबा म्हणाले…”शाम, आज आषाढी एकादशी…आज आठवडाभराने तू डोळे उघडलेस बेटा.. डाॅक्टरांनीसुद्धा विठोबावर हवाला ठेवायला सांगितलं होतं रे”
बाबा, माझा मित्र कुठाय? मला भेटायचंय त्याला…
तितक्यात शामची आई मोहसीनला घेऊन आली…
शामच्या मनात आलं..याचंच काळं तोंड पाहिलं आणि मला अपघात झालाय..आई याला का घेऊन आली असावी? तिरस्काराने शामने मोहसीनकडे पाह्यलं…

आई म्हणाली, “ शाम… तू ज्या विठूला भेटायला गेला होतास तोच तुला भेटायला आला रे संकटकाळी…त्याचं राऊळ सोडून…याच्याच रूपात येऊन विठ्ठलाने तुला वाचवलं…

“और ये अल्लाह का नेक बंदा पंढरपूर जाके विठूसे तेरेलिये दुवाभी माँग आया..बोल रहा था..वारी चुकायला नको शरदकाकांची”, असं म्हणत इस्माईलचाचा.. मोहसीनचे आईबाबा… शामजवळ बसले.

आता शामच्या डोळ्यात गंगाजमुनेला पूर आला. तिरस्कार द्वेषाबरोबरच सगळी किल्मिषं त्या पुरात वाहून गेली..अनेक वर्षांच्या जातिधर्माच्या सगळ्या भिंती गळून पडल्या…
शाम आणि मोहसीनची गळाभेट झाली..

मोहसीनच्या जागी शामला पंढरीच्या विठूरायाची सावळी साजिरी मूर्ती दिसली..
विठ्ठल आणि अल्लाह एक झाले….
अवघा रंग एक झाला….

सविता कारंजकर, सातारा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: