नि:शब्द

त्याच्या प्रश्नाचे आस्माने काही उत्तर देणे अपेक्षित आहे असे तिला वाटत नव्हते. ती स्वत:तच मग्न होती.
“कितीला दिला हा दिवा ?” त्याने पुन्हा विचारले.
पण कुठलेही उत्तर न देता ती स्वत:च रमली होती. त्याला खुप आश्चर्य वाटले.

मातीची सुंदर सुंदर भांडी, कुंड्या अनेक गोष्टी दिसत होत्या. पाहिलं की घ्याव असं वाटावं इतकी कलात्मकता होती त्या वस्तुंमधे. सगळे रंग जणु एकमेकांचे सौंदर्य वाढवत होते. त्यात जांभळ्या रंगांचा दुप्पटा ओढुन ती मन लावुन हातातल्या दिव्याकडे पहात होती. मुळात दिसायला सुंदर असेल ती पण राधेच्या नजरेतली भक्ती तिच्या नजरेत दिसत होती. आपल्या ओढणीने दिव्याला पुसत ती कुठल्यातरी विचारात रमली होती.

“सुनो…मैने कुछ पुछा है, तुमने सुना क्या?” त्याने हिंदीत विचारलं. तिला मराठी येत नसावी समजुन त्याने तिला हिंदीत विचारले.
तिने पटकन वरती बघितले. तिच्या डोळ्यात त्याला एक कुत्सित हास्य दिसले. तिने त्याच्याकडे पाहुन विचारले,” क्या खरीदोगो साहब…जो पहेलेसेही बिक गया है…”
हे ऐकुन त्याला क्षणभर कळले नाही की हिला नेमक काय म्हणायचं आहे. ती पुढे बोलेल हया आशेने तो उभा होता पण ती त्या दिव्याला कुरवाळत बसली होती. त्याला खुप आश्चर्य वाटले.

“विकायचं की नाही ते तरी सांगाव ना सरळ…” असं स्वत:शीच चिडुन बडबडत तो निघायला आणि तेवढ्यात मागुन एक पन्नाशीचा चाचा ओरडुन म्हणाला, “साब…दुसरा कुछ चाहिये क्या बोलो…वो बेचना नही है…”
हे ऐकुन त्याची उत्सुकता चाळवली. मग तो चाचाकडे वळत त्याने सरळ विचारले,”ऐसे क्यो…”
“क्या बोलु साब…ये रंगभरी दुनिया है…कलाकार है हमारी आस्मा… हर एक रंग उसनेही भरा है…बस उसके जीवन मे सारा अंधियारा हो चुका है…”चाचा एकदम भावुक झाले होते.
त्याला कळलं नाही की असं काय घडल असेल की ते असे बोलत आहेत.

त्याला गप्प विचारात पाहुन चाचाच पुढे बोलु लागले, “ऐसेही ये रोज ठेले पे अपनी कलाकारी दिखाती थी…सब लोग तारीफ कर कर के खरिदते थे…ऐसे ही वो भी आता था…शायर था अच्छा…इसके रंग आैर उसकी शायरी अच्छी जमती थी…ये दिया इसने अपने हाथोंसे उसके लिये बनाया था…उसने ये दिया उसके घरमे लगाया और इसे दिखाने लेके जाने के बहाने इसका सारा लुट लिया…सच्चा प्यार समझकर ये दिवानी सब कुछ दे बसी…दुसरे दिनसे उसका आना बंद हुआ, कोई आता ना पता, मुसाफीर था कोई, लौट गया… पर ये अपने प्यारकी निशानी ये दिया लेके आयी…कभी तो वो आयेगा इस उम्मीदपे जीती है…जब दिल करे सारे रंग भरती है… पर साब, देखो गम का रंग उसे छोड नही रहा है…कभी तो लगता है की ये दिया ही तोड दु तो सारी यादे मिट जायेगी…”

चाचाच्या या बोलण्यावर काय बोलावे हे त्याला क्षणभर कळले नाही. ती दिव्याला ओढणीने पुसत होती खरी पण चाचाच्या बोलण्याकडे तिचे लक्ष होते. त्यांचे बोलणे ऐकुन ती स्वत:शीच हसत पटकन म्हणाली,
“ऐसे दिये तोडकर यादे मिट जाती तो जिंदगी कितनी आसान थी…वो नही आयेगा पता है पर कुछ तो छोडकर गया है मेरे लिये ये खुशी कम है क्या? इसलिये संभाला है…खुदको संभालने के लिये…”
हे बोलताना बंद दिव्यातुन तिच्या चेहरयावर प्रकाश झळकत होता. निशब्दपणे तो पहात राहिला…

प्राजक्ता रुद्रवार
रावेत, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: