पैंजण

आज प्रेम सापडलंय मला पुस्तकांच्या गर्तेत बिचारं कोमेजून धूळखात पडलेल्या एका पुस्तकात दडून बसल होतं पत्र…!

अलगद त्याला उघडताच ते बोलकं झालं.


प्रिय,

तुझी पैंजण अजूनही जपून ठेवली आहे मी, तुझ्या गावी येताच तुझ्या भेटीला आलो होतो. तुझ्या दारी पाऊल पडताच तुझा साखरपुडा होतांना दिसला. तुझी साथ मागायला आलेली ती पाऊले तशीच घेऊन माघारी मी परतलो.

तुझ्या पायातील “पैंजण” त्यांच्या मधुर आवाजाने मला तुझ्या प्रेमात पाडायची अन मीही बेधुंद होऊन त्यात रमायचो. अगदी स्वप्नवत.

हिंमतीने तुझ्या घरी आलो होतो, तुझा हात-हातात देशील का ? या विचाराने, आशेने. परंतु, पाऊल टाकताक्षणीच दिसला तो सोहळा अन माझेच स्वप्न मला मला टोचू लागले. अगदी गदगदून आलं होतं, डोळ्यांतून पाण्याचा टिपूसही न गाळता परतलो आल्या पावली.

जणू आभाळ कोसळतय असं वाटतं होतं, अन उशीर केल्याची जाणीवही चटका लावून गेली.

कुटुंबाच्या प्रेमापोटी तू ही शांत राहीलीस आणि तुझ्या त्या पैंजणला माझं बनवायला उशीर झाला, तो कायमचाच…!

तू तुझ्या जिवनात सुखी असशील, अशी आशा आहे, माफ कर हे बोलायला ही तुझ्याजवळ मी येऊ शकलो नाही, गेल्या दोन दिवसा आधी तुझी नि माझी वाट चुकली, तुझ्या सोबत बोलायची, येऊन तुला कुशीत भरून घ्यावं अशी इच्छा झाली.

तुझ्या वरून नजर हटेना, तू अजूनही तितकीच सुंदर आहे, तुला बघताच माझी पाऊल तुझ्या कडे वळायला लागली होती पण नजर तुझ्या नवऱ्यानी पकडलेल्या तुझ्या हाता कडे पडली, मी तशीच माझी पाऊल मागे घेतली, तुला बघत मी तिथेच होतो, तू नजरेआड होईपर्यंत.

कसं सांगावं, कुठे बोलावं, मला कळेनासा झालं, माझं प्रेम अजूनही तूच आहे. तुला सांगावस वाटत, पण तू तुझ्या संसारात खुश आहे हे पाहून मला आधार मिळाला.

हे पत्र तुला पाठवतोय, चुकीचं समजून घेऊ नकोस, माझ्याविषयी झालेला गैरसमज दूर होईल बस या आशेने हे पत्र लिहलंय. तुझ्या चेहऱ्यावर वरील हसू माझा जीवन आहे, नेहमी हसत राहा. तुझा नवऱ्याचे तुझ्या वर खूप प्रेम आहे मी त्याच्या नजरेत बघितलं, तुझ्या विषयीचा आदर, प्रेम. तू ही त्याला स्वीकारून घे. आणि आनंदात राहा.
मला माफ कर…
कधी कळत न कळत वाट चुकली तर क्षणभर थांबशिल ना माझ्या साठी ?

तुझ्या पैंजनांचा राखीव !
प्रितेश


हे पत्र कदाचित अजूनही तिच्या जवळ पोहचलं नाही, त्या पुस्तकावर लिहलेले नाव हे अजूनही त्याचेच आहे. प्रेम काय हे अजूनही दिसून येत हो, प्रत्येकाचं प्रेम हे टोकाला जाईलच अस नाही. पण प्रेम निस्वार्थी असेल ना तर ते असा असेल.

लेखन : मंजिरी खंडारे,
अमरावती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: