सुप्त

शीतल दरंदळे

किती प्रेम करावं एखाद्याने आपल्या बायकोवर ? अमित चं मेघना वर निरतिशय प्रेम. तिला पाहिल्याशिवाय दिवस उगवत नसे त्याचा. तिच्याच हातचा चहा मग दोघे गलरीतल्या झोक्यावर बसून पिणार,अमित मग तिच्याकडे पाहत बसे प्रत्येकवेळी जणू काही पहिल्यांदा पाहतोय. ती नेहमी हसत म्हणे असं काय पाहतोस? तो म्हणे माझी बायको आहे म्हणून पाहतोय. ती यावर हसे,तिच्या गालाची खळी मग याला भुलवे, लग्नाला नऊ वर्ष होऊनही. तिचं सौंदर्य एखाद्या राजकुमारीलाही लाजवेल अस होत.

नऊ वर्ष होऊनही दोघेच.बाळ होऊच द्यायचं नाही असं अमितच म्हणणं मेघनाने ही जास्त आढेवेढे न घेता काही न बोलता मान्य केलं. अमितचा हट्टच होता, मुलं नको. तिच्या प्रेमात भागीदार नको असं त्याच मतं. ती कधीच काही या विषयावर बोलली नाही. फक्त एकमेकांच्या प्रेमात राहायचं,एकमेकांसाठी जगायचं. जगाची फिकीर कशाला उगीच? हवं तेव्हा फिरायला निघत दोघे, अख्खा भारत फिरून पालथा झाला दोघांचा. आता वेड परदेशाचे.

अमितने आता सुटी टाकली पाच दिवसांची. मेघना बरेच दिवस कुठला आयलंड पाहायला जायच असं म्हणत होती. शिकोबी नाव त्याचं. अमित ने कधीच हे नाव ऐकलेलं नव्हतं. तिने सांगितलं नवीनच आहे, बघुयात जाऊन जास्त कोणी नसत तिथे, गर्दीही फार नसते. आपण मस्त मजा करूयात. अमितने सगळी माहिती काढून बुकिंग केले. तिने दोघांची बॅग भरली. शिकोबीला जायला पहिल्यादा विमान आणि मग बोटीने प्रवास.

दुसऱ्या दिवशी रात्री ते दोघे शिकोबी ला पोहोचले. इतक्या वेळेचा प्रवास करून थकले होते. शिकोबी आयलंड तसं फार मोठं नव्हतं. तिथल्या एकमेव हॉटेल मध्ये ते दोघे उतरले. हॉटेल मोठे प्रशस्त होते, मेघना खूप खुश झाली.अगदी सगळ्या सोयीसुविधा होत्या. त्यांचं वेलकम ही अगदी शाही पद्धतीने झालं. दोघाना त्यांचा राहण्याचा प्रशस्त स्वीत दाखवण्यात आला. दोघे अतिशय खुश झाले.अपेक्षेपेक्षा फार सूंदर रूम होती. खिडकीबाहेर नजर जाईपर्यंत निळाशार समुद.हेच हवं होतं दोघांना. बॅग्स टाकून मेघना फ्रेश व्हायला गेली.

अमित पाहत होता, किती नारळाची झाडे,त्याला बांधलेले झोके, हवं तितक्या वेळ बसू शकतो. समुद्राची पांढरीशुभ्र वाळू, आजूबाजूला आणखी फार कोणीही नाही. आणि काय हवं? इतकं सूंदर destination सुचविल्याबद्दल तो मेघनाला शाबासकी देत होता. मेघना केस पुसत बाहेर आली, अमित ते सौन्दर्य पाहतच राहिला. पटकन पुढे होऊन त्याने तिला बाहुपाशात घेतले. तिची कळी खुलली. तिचे माने वरचे केस बाजू करून तो तिचे चुंबन घेऊ लागला. ती पटकन पुढे सरकली व तिने त्याच्याकडे टॉवेल देऊन त्याला बाथरूमचे दार दाखवले. तो नाखूष होऊन फ्रेश व्हायला आता गेला.

मेघना खिडकीतुन बाहेर पाहू लागली आणि चमकली तो समुद्र जणू तिला बोलवत होता. कुठली अदृश्य शक्ती तिला खेचत होती. ती जवळ जाऊन पाहू लागली पण तिला घाम फुटला तिने खिडकी बंद करून घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आटपून फिरायला निघाले. सूर्योदय नुकताच झाला होता. फार सूंदर रंग आकाशात पसरला होता.कोवळं ऊन होते अगदी किंचित थंडी वातावरणात पसरली होती.दोघे समुद्र किनाऱ्यावर फिरायला आले. मेघना अगदी पळतच पाण्यात घुसली. अमितही तिच्यामागे पळतच आला.खूप वेळ पाण्यात खेळत बसले दोघे. थोड्यावेळाने दमून बाहेर आले आणि दोघे वाळूत बसले. असा निवांतपणा दोघे अनेक दिवसांनी अनुभवत होते. मेघनाला भूक लागली अमित काही खाण्याचे आणायला हॉटेल मध्ये गेला.

(advt.)

अमित जातो न जातो तोच एक नारंगी मासा पोहत मेघनाकडे आला. त्याच्यामागे अनेक जण आले. मेघनाला गंमत वाटली. अनपेक्षितपणे त्या मस्याने अर्धमानव रूप धारण केले आणि मेघना समोर आला. मेघना घाबरली. तो अर्ध मानव मासा बोलू लागला “घाबरू नये,राणीसरकार,तुम्ही अखेर आलात आम्हाला वाचवायला, आम्ही सर्व तुमचीच मुलं आहोत, या “मेघनाला काहीच कळेना.” खूप वर्ष आम्ही वाट पाहत होतो तुमची, आम्ही तुमचीच मुले आहोत राणी सरकार, आम्हाला एक मोठा राक्षस मासा त्रास देत आहे आपण चला” असे ते मासे आवाज करू लागले. मेघना उठून पळू लागली.

अमित ला येऊन धडकली. अमितने विचारल्यावर मेघना ने सर्व काही खरे सांगितले. अमित खो खो हसायला लागला. त्या दोघांनी येऊन परत जागा पहिली तर तिथे काहीच नव्हते. मेघनाला आश्चर्य वाटले. दोघे शेवटी आपल्या रुममध्ये आले, मेघना जेव्हा झोपली तेव्हा तिला तेच सतत आठवत राहिले, माझी मुलं संकटात आहेत त्या राक्षस मास्यापासून.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मेघना एकटीच समुद्र किनाऱ्यावर गेली. अमित झोपला होता, उठल्यावर त्याने सगळीकडे पाहिलं तेव्हा कोण्या एक स्टाफने सांगितलं ती समुद्राकडे गेली आहे. अमित लगेच किनार्यवर आला धावत, तिथे त्याला ती कुठेच दिसेना. तिला आवाज देत खूप फिरला. पण कुठेच नाही. एका खडकावर त्याला तिची ओढणी दिसली. तो घाबरला. त्याने पोलिसांना कळवलं, पोलिसांनी खूप शोध घेतला, कदाचित ती पाण्यात पडली असावी किंवा आत्महत्या? रात्रभर शोध घेण्यात आला, पण बॉडी ही मिळाली नाही.

अमित हतबल, शॉकमध्ये. पोलिसांनी त्याची बरीच चौकशी केली. पण काही पुरावा नसल्याने त्याला सोडण्यात आले. आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
अमित विमनस्क अवस्थेत घरी पोहोचला. नक्की काय कारण असावे? घरी आल्यावर अनेकजण भेटायला आले. तो खूप रडला. त्याला अजून आशा होती मेघना आहे जिवंत ती येईल. तिला काही झाले नसणार.

आज सहा महिने झाले अचानक मेघना अमितच्या समोर आली. अमितशी बोलू लागली,”अमित मी आहे रे माझ्या मुलांसोबत, ते खूप संकटात होते तर आईने वाचवलं पाहिजे ना ? मी आई आहे त्याची, मी त्यांच्यासोबतच आहे”
अमित पटकन तिला पकडणार तोच तो धाडकन झोपेतून सोफ्यावरून खाली पडला. म्हणजे मेघनाला आई व्हायचे होते? तिची सुप्त इच्छा तर नव्हती? माझ्या हट्टाने तिला मारले तर नाही? अनेक प्रश्न अजूनही सुटलेच नव्हते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: