नियतीचा डाव

यंदा उन्हाचा तडाका जास्त असल्यामुळं संपूर्ण गावात एकच चर्चा रंगली- ती म्हणजे, कीर्तक सुरू झालं. पाऊसपण जास्तच पडेल, अशी सर्वांची आशा होती. दरम्यानच्या काळात गावातील सर्व शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त होते. दिवस-रात्र शेतीची मशागत करून पावसाळ्यापूर्वीची कामे संपवायच्या नादात गुंग होते. गावाच्या महादेवाच्या मंदिरातील चौघडा वाजू लागला तेव्हा कुठं साहेबरावाच्या लक्षात आलं- रात्रीचे सात वाजले. बाहेर कट्ट्यावर बसलेल्या आया-बायका पटकन उठल्या आणि देव्हाºयासमोर दिवा लावायला गेल्या.
एवढ्यात साहेबराव धापा टाकीतच घरात आला आणि बायकोला एकच हाक मारली- ‘‘अगं सुमे, स्वयंपाकपाणी झालं का नाही. मला जेवण करून पटकन शेताला जायचं आहे.’’
नवऱ्याच्या आवाजाला साथ देत सुमन म्हणाली, ‘‘अहो कारभारी दिवसभर शेतात काम करून आलाय. आत्ता रात्रीचं काय काम आहे.’’
एवढ्यात साहेबराव म्हणाला, ‘‘अगं कीर्तक सुरू झालंय. उरलेली कामं पटकन उरकलं पाहिजे. पाऊस लवकरच पडेल.’’
सुमन म्हणाली, ‘‘बरं, ठीक आहे. जावा शेताकडं.’’
तसा साहेबराव बायकोला मला म्हणाला, ‘‘अगं सुमे, मी शेतीच्या कामात आहे. मुला-बाळांकडे तू लक्ष ठेव. कारण पावसाळा जवळ आल्यामुळं मला शेतातील कामं उरकायच्या आहेत.’’
तसा सुमनचा आतून आवाज आला, ‘‘अहो कारभारी या जेवायला.’’
बायकोच्या आवाजाने साहेबराव ताडकन उठला आणि जेवायला बसला. शेताकडं जायच्या नादात घास-दोन घास कसंतरी ओरबडून खाल्लं.
जाता जाता बायकोला सारं बजावून सांगितलं.
साहेबराव हल्ली स्वत:च्या तंद्रीतच असायचा. कारण गावात एकच चर्चा होती- ती म्हणजे करणी करणारा कोणीतरी भेंदूबाबा गावात आला आहे. तो करणी करत करत फिरतोय. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. साºया गावात त्या बाबांविषयी भीती निर्माण झाली होती.
साहेबरावांनी सोबतीला हातात एक काठी घेऊन शेताकडे निघाला. वाटेत जोडीदार मारुतीला हाक मारली. तसा मारुती पटकन उठला. बायकोला हाक मारली. तेवढ्यात बायको बॅटरी घेऊन दारात आली. दोघं मिळून शेताची वाट धरली.
सहा महिन्यांपूर्वी त्याच्या एका मुलाला गावातील एका ज्योतिषाने करणी करून मारून टाकले होते. आता पुन्हा गावात नवीन आलेल्या भोंदूबाबाने खळबळ माजली होती. त्यामुळे डोक्यात अनेक विचार यायचे. पण या अडाणी रावसाहेबाला काय करावं काही सुचत नव्हतं.
कारण पोटचा गोळा गेल्याने रावसाहेबाच्या मनात चलबिचल निर्माण झाली होती. यामुळे त्याच्या मनात ज्योतिषीबद्दल राग निर्माण झाला होता. पण काय करावं, काय नाही, असं त्याच्या डोक्यात सारखा यायचं.
तो मारुतीला म्हणाला, ‘‘काय रं मारुती, गावात काय चर्चा रंगली माहीत हाय का नाही.’’
‘‘हाय रं. काय करावं काई कळेना.’’
‘‘पण लेका, या असल्या माणसांची शेवटच करायलं पाहिजे.’’
‘‘अरं सायबा, तू म्हणतो ते खरं हाय; पण कसं निकाल लावायचा.’’
‘‘ह्या लोकास्नी डायरेक्ट उडवलं पाहिजे.’’
‘‘पण कसं’’
‘‘एक सांगू का, सगळेच नुसते हो म्हणत्यात. कोणी पुढं येत नाही.’’
चालता चालता कधी पाणंद आलं हे त्यांना कळलं नाही. शंका-कुशंकेने मनात चलबिचल निर्माण केलं होतं. एवढ्यात फर्लांगभर अंतरावर आगीचं लोळ दिसलं. ते बघून दोघांच्या मनात धस्स झालं. पळत पळतच शेत गाठलं. समोर बघून साहेबराव ढसाढसा रडत होता. मारुती त्याला शांत करत होता. काय करावं हेच सुचत नव्हतं. कारण त्या आगीत साहेबरावाचं कडब्याची गंज कोणीतरी पेटून दिली होती. वर्षभर जनावरांना पुरेल इतका कडबा त्या आगीत जळून खाक झालं होतं.
अगोदरच मनातील शंका-कुशंकेने त्याचं मन ग्रासलं होतं. त्यात ही आपत्ती झाल्यानं तो पूर्णपणे नेस्तनाबूत झाला होता. एकीकडे पाऊस तोंडावर आलाय तर दुसरीकडे वर्षभरासाठी केलेली जुळणी कुणीतरी आगीत भस्म करून टाकलाय. यामुळे त्याच्या मनानं उचल खाल्ली.
एवढ्यात मारुती साहेबरावला म्हणाला, ‘‘झालं गेलं विसरून जा सायबा. माझ्याकडं शिल्लक हाय तो कडबा मी तुला देतो.’’
पण साहेबरावांचं मन काही केलं शांत बसेना.
सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या पोटच्या गोळ्याच्या निधनाने तो पूर्ण खचला होता. तरी पुन्हा नव्या उमेदीने तो कामाला लागला होता. पण नीतीने पुन्हा त्याच्यावर घाला घातला. यामुळं साहेबराव पुन्हा पेटून उठला.
जो कोणी असेल त्याचा नेस्तनाबूत केल्याशिवाय तो आता शांत बसणार नाव्हता. रात्रीच्या किर्रर अंधारात तो ताड्ताड् निघाला. वाटेत स्मशान शांतता. त्याच्यासोबत फक्त त्याची सावली सोबत होती. मोहीम फत्ते करण्यासाठी निघाला होता. पण नियतीनं त्याच्यावर पुन्हा वार केलं. अंधाºया रात्री त्याला भोवळ आल्यासारखं झालं अन् धाड्दिशी खाली कोसळलं. डोक्याला मार लागला. स्वत:ची शुद्ध हरपली. संपूर्ण अंग घामाने चिंब भिजलं होतं. त्याला काय करावं काहीच सुचेना. हातपाय हलवत होता. उठून बसण्याचं धाडस करत होता.
पण.. पण…साहेबराव आर्त हाक मारत होता. मदतीची भीक मागत होता. ह्या अंधाºया कोण येणार…शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. साहेबराव स्वत:चं दु:ख स्वत:च्या मनात ठेवून या जगाचा निरोप घेतला. या वेळी त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं. होतं फक्त त्याचं मन आणि हातातील एक काठी. याच काठीनं त्याला आयुष्यभर साथ दिली. शेवटी जाता जाता काठीचाच त्याला आधार घ्यावा लागला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: