गुरुदक्षिणा

प्राजक्ता रुद्रवार

आज सकाळपासुनच त्याच्या पोटात कालवाकालव होत होती. सरांचे आभार कसे मानावे हे त्याला कळत नव्हते. आज हे जग नव्याने बघताना त्याला सरांची आठवण येत होती.
त्याच्या प्रगतीसाठी सरांनी घेतलेले कष्ट तो जाणुन होता. लहान असतानाच आई वारली होती, वडिल सततच आपल्याच व्यापात असतं. त्यामुळे त्याला येत चाललेला एकटेपणा, बुजरेपणा जाणला तो दिक्षित सरांनीच.

“राघव…तु असा अलिप्त रहात गेलास तर सगळ्यांपासुन दुर होशील…तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य तु ऐकलं आहेस का? तुझ्या प्रगतीसाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील…किमान तु तुझ्या हुशारीविषयी जाणुन घे, अभ्यास करत जा…” दिक्षित सर अगदी कळकळीने बोलत होते. पण राघवच्या चेहरयावरची आठी हालत नव्हती. त्याच गंभीर चेहरयाने त्याने मान हलवली व तो वर्गात गेला. सर कायम त्याला मागे लागत व त्याचे शिकण्यात मन रमवतं असतं. त्याचा बुजरा स्वभाव बदलण्यापेक्षा त्याला स्वत:च्या बुध्दिमत्तेवर विश्वास ठेवुन पुढे कसे जायचे हे सर त्याला कायम शिकवत असत. हळुहळु राघवच्या अबोलपणात फरक पडला नाही तरी त्याची अभ्यासात प्रगती होत होती. त्याचा अभ्यासातला आत्मविश्वास दिसुन येत होता. कुणाशीही न बोलता तो एकटाच बसत असला तरीही तो अभ्यासात रमत होता.

आज स्काँलरशिप परिक्षेचा निकाल लागणार आहे हे माहिती असल्यामुळे निकाल ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते.  दिक्षित सरांच्या तासात सरांनी वर्गात निकाल जाहीर करत म्हणले,

“आज हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतोय की, आपला एक विद्यार्थी स्काँलरशिप परिक्षेत तालुक्यातुन पहिला आलायं…आज त्याच्या या यशामुळे शाळेचे नाव उंचावले आहे…”

सगळ्यांच्या चेहरयावर मोठे प्रश्नचिन्ह होते की हा पहिला येणारा विद्यार्थी आहे तरी कोण?”.
 सगळ्यांनी एकच गोंधळ सुरु केला,”कोण आहे तो विद्यार्थी…नाव सांगा ना सर…”

guru-dakshina
या कथेचे प्रायोजक आहेत. पॉवरमॅथ्स.
“शिका गणित, घरी बसून”

सरांनी सगळ्यांना शांत केले व सरांनी आवाज दिला,”राघव…समोर ये बाळा…”

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. राघवला खुपच लाजल्यासारखं झालं. त्याने खाली मान घातली व सगळ्यांच्या नजरांना नजर देणे त्याला शक्य होत नव्हते. बाजुला बसलेल्या रविने त्याला बळजबरीनेच सरांसमोर उभे केले. सरांनी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला व ते म्हणाले,

“असाच मोठा हो बाळा…तुझा आम्हाला अभिमान वाटतोय…स्वत:चा स्वत:वर विश्वास ठेव…यश तुझ्या दाराशी उभे राहीलं…”

स्वत:च्याही नकळत राघव सरांच्या पाया पडला व सरांनी त्याला जवळ घेतले. राघवच्या डोळ्यातुन पाण्याच्या धारा वाहु लागल्या. सगळ्याच मुलांच्या डोळ्यात पाणी होते. त्यानंतर मात्र राघवने मागे वळुन पाहिले नाही.

“सर, आत येऊ का?” हे ऐकुन सरांनी लगेच ओळखले की हा नक्की राघवच आलाय. 

“अरे ये ये…काय म्हणतोस राघवा…” म्हणत सरांनी राघवला आत यायला सांगितले. 

“सर…मेडीकलला माझी अँडमिशन झाली. सरकारी जागा मिळवुन…हे महत्वाचे. म्हणजे घरच्यांवर फीसचा खुप ताण नाही येणार आता..” हे सांगुन तो सरांच्या पाया पडला.

सरांना खुप आनंद झाला. इतकी हुशारी असलेला हा मुलगा कधी काळी कसा होता हे आठवुन गेलं. त्याला शाबासकी देत सरांनी डब्बीतली खडीसाखर त्याच्या हातावर ठेवत म्हणले,”खुपच छान रे राघवा…चल तोंड गोड कर…”. त्या साखरेचा गोडवा कधीही न विसरता येणार होता.

सरांनी त्याला मरणोत्तर देहदान करण्याचा फाँर्म भरायला सांगितला होता. खरंतर आपले आयुष्य विद्यार्थी घडवण्यासाठी घालवले व मरणानंतरही आपल्या देहाचा उपयोग व्हावा हे वाटणारे गुरु लाभले याचा त्याला गर्व वाटत होता.

त्याने आज उद्या येतो सर,  म्हणल्याबरोबर सरांनी त्याला रागावले, “राघवा…प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळ करावी…संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते…”
राघवने हो म्हणले. त्यावर ते आनंदले.

“तु माझे इतके काम कर…हीच खरी गुरुदक्षिणा ठरेल…” असे म्हणुन मागणी करणारया सरांना आज हे माहिती नव्हते की त्यांच्याच डोळ्यांनी राघव हे जग पाहु शकणार आहे. आज अपघातात डोळा गमावल्यावर महिनाभर अंधपणा आलेल्या राघवच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता.

डोळ्यावरची पट्टी उघडल्याबरोबर त्याने पहिल्यांदा सरांच्या फोटोकडे पाहिले व हात जोडले. कारण गुरुदक्षिणा देऊनही खरया अर्थाने तो सरांच्या ऋणातच रहाणार होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: