जळवा

बबन पोतदार

ऊन्ह कासराभर वर आली होती. तापलेला फुफाटा पायांची लाहीलाही करीत होता. लांबवर भैरोबाच्या देवळाचं शिखर दिसायला लागलं होतं.

पोराला खांद्यावर बसवून अण्णा मल्हार टुकूटुकू चालला होता. एक एक पाय रेटत होता. पाटील बाबाची टेकडी संपली आणि कापुरहोळचा ओढा लागला. पाणघळीत पाण्याचा टिपूस नव्हता, ओढ्याच्या पात्रातले दगडगोटे आणि वाळू, भट्टीतल्या लोखंडासारखे तापले होते. त्यावर पाऊल ठेवायची सोय नव्हती. तुटक्या वहाणा सांभाळीत लव्हारानं तो ओघळीवजा ओढा लगालगा पार केला.

गाडीवाट सोडून तो आता पाऊलवाटेला आला. मैलभराच्या चौफेर परिसरात माणूसच काय, एखादं चिटपाखरूही दिसत नव्हतं.

करकचून बांधल्यासारखा वारा थबकून गेला होता. मध्येच एखादी गरम झळ घेऊन ऊन अंगावरून पळून जायचं. एकदमच कुठंतरी छोटीशी वावटळ गाडीवाटेतल्या मातीला अधांतरी गोळा करून गोल फिरत रहायची.

दीड-दोन तास कुस्ती केलेल्या पैलवानासारखी लव्हाराची दमछाक झाली होती. छाती बेडकासारखी उडत होती.

“उग उलीसा इसावा घ्यावाच असं स्वतःशीच तो काहीसं बडबडला.

गाडी वाटेला दोन-चार धुकार झाड आपलीच सावली शोधीत खुळ्यागत उभी होती.

वाट सोडून मध्येच कुठंतरी यादलेल्या एका करजाडाखाली थोडसं सावलीत उभा राहून त्याने पालखी दांडा अलगद खाली ठेवावा तसा पोराला उतरवून ठेवला. गरम फुफाट्यात चालून दमलेल्या म्हसू माळ्याच्या रेड्यागत त्यान एकदा नोक फेदारलं आणि एक लांबलचक सुस्कारा टाकून तो पोराला म्हणाला, “आगा, म्हैपा चालवाना गा माज्याच्यानं आता. कुटनं लेका, बैटा करून घिटम पायाळा आन् ताप समद्यास्नी!”

डावा पाय बगळ्यासारखा वर करून महिपा समोर उभा होता. अपराधीपणाची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याचे डोळे तराळले. भरताच्या वांग्यासारखा कोमेजलं तोंड करून तो भाजल्यागत बोलला, “आया, बळच बिलामत वडून घ्याला म्या काय येडा बिडा हाय व्हय? उगं चुकार शेंगा येचाय गेलो आन् सड घुसला ह्यो आंगठाभर! बळ ती बळ ह्यो पाय वाचला, नायतर दुनिया गलत काम!

“बरं बरं, लै शेना हाईस, व्हय!” नाक आणखीनच फुगवीत लव्हार बोलला.

बाजूला नीट बगून चालाय नगो आन् म्हन येडा हाय “

पोरं आणखीनच डाडरल ! पाय अवघडून आला होता, यापाच्या तपकिरी डोळ्यात नजर खुपसून कसंबसं म्हणालं, “लैच तरास हया लागलाय वो! सोसवाना झालया!”

पोराच्या डोळ्यात पाण्याच तळे बघून लव्हाराचा चेहरा एकदम पालटला.

त्याच्या भुवया नाकाजवळ खोयणीत गोळा झाल्या. हात-पाय थरारले. एक लांब श्वास घेत त्यानं महिपाला जवळ घेतले. त्याच्या कपाळाचे मटामटा मुके घेतले, शब्द फुटत नव्हता तरी तो कसाबसा बोलला, “लेकरा, खरंच कसा सोसत आसशील रं? माज्यासारखा कवाच मातीत गेला असता. पाय म्हनायचा का खुट र केळाचा ह्यो? कसा लिबलिबीत झालाय बगीटलास?”

पोरणं जास्तच रडायला लागल, त्या छोट्याशा डोळ्यांतल्या बाहुल्या तरळलेल्या पाण्याच्या डोहात पापण्यांमध्ये तरंगू लागल्या.

“उगं गप रं माझ्या लेकरा-” असं म्हणत त्यान पोराला उधलून पुन्हा खांद्यावर घेतलं आणि गरम फुफाटा तुडवायला सुरवात केली

गावाच्या सुरवातीलाच कलालाचा वाडा होता.

लव्हार पोराला घेऊन गावात शिरला त्या वेळी उन्हाचा लोट कोसळत होता

त्या धिमण्या जिवानं बापाच्या मुंडाशात मान टेकवली होती पायाला कमालीचा ठणका लागला होता.

कुणी तरी नवखा माणूस पाहून कलालाच कुत्र धडपडून उभ राहिलं बिथरून गेलं आणि देठापासनं ओरडायला लागलं. कोकलत लहारामागं चारी पाय फास्टून चालायला लागलं.

का वराडतुयास रं बाबा? कोण चोरवीर न्हाय आमी-” लव्हार त्याध्या डोळ्यात बघत पुटपुटला. त्या जनावराला काहीच बोध झाला नाही ते भुकतचं राहील, एव्हाना आणखी दोन कुत्री त्याच्या मदतीला आली होती आणि एकच पिटा सुरू झाला.
एकाला सोडून तीन दांडगी कुत्री बघून लहार चांगलाच येरमाळून गेला. एकाच जागी सर्कशीच्या खांबासारखा खुटारला. काय करावं काही सुचेनासं झालं.

कुत्र्यांचा गलका ऐकून सोमा कलाल वाड्याच्या बाहेर आला. रस्ता दाह ओकीत होता. एक अस्सल शिवी हासडून त्यानं तिन्ही कुत्र्यांना वाटेला लावलं.

तोंडात उन्हाची वाफ आत ओढून एकवार त्यानं घुटक्यासरशी गिळली आणि ल्हाराजवळ जात विचारलं

“कोण गावाचं पाव्हनं?”

“रिसवड-“

“आन् काय झालय गा लेकराला? काय पाय म्हणायचा का भोपळा वो ह्यो?

डोळे फाडून त्याच्या खांद्यावरच्या पोराचा पाय बघत कलालानं प्रश्न केला.

“आवो, समदं भोग हायती आपलं आन् काय दुसरं.? गेल्या जलमात केल्यालं पाप काय म्हणायचं.”

“तरी पन झालया तरी काय आसं? नारू बिरू म्हनायचा त्यो ह्योच का?”

“न्हाई व्हो पावन-सड घुसला म्हणून निमित्त झालं आन् ही आसं कून बसला बघा चार दिसात-” लव्हारानं खुलासा केला.

“आगागा! कसली वो ही बैदा लेकरामाग!” आणखी एकदा तोंड आत ओढीत काय बोलले

“सोस हात सारं सोसून पाहिजे, पिताजी न्हाय पण-“

“पर आता काय ठरिवलयसा? कुठसं चालीयलय पोराला?”

“गवसभाईचं नाव ऐकून हाय जळवा लावतुया म्हणी त्यो नासक रगात भाईर पडलं मजी, चांगला हुईल म्हनत्यात पाय-“
“व्हय, व्हय खरं हाय पर… पर सोसवल का यो त्ये लेकराला? जळया वंगाळ आसत्यात वो-“
“खराय समद, पण करणार तरी काय दुसरं काय विलाज हाय आनि कांय ?”
“हाय खरच तरी पण”
“पण काय?”
“जरा ऐकशील?”
“म्हणून त्या ऐकतो पणा पाय-“
“मंग असं कला”
“कस म्हणतो?”
“पड्याल लिंबाजवळच्या पादुकांच्या सपा कोळ्याकड जाऊ या.
गेल्या सालाला कायड आनता आनता त्येच्या पायात आसाण नर बागीचा काटा पुसला होता. पाण्यात भिजून भिजून कुजला पगा पाय काट्यासगट आन् हाच प्रकार व्होऊन बसला, आगदी आसाच माय.”

“मंग काय केलं त्येनं?”

‘आयो हुं का काम्य? चार म्हैस हातरुनात होता. म्हमईच्या पोराला लिव्हलं तवा ततनं अगोदर इचार धिवून आला म्हनं त्यो.”

“काय?”

“पाय काडाय पायजे म्हनत होता!”

“आता रं देया “

पर नाय काडाय लागला. कसा म्हाईती हाय?”

“काय केलन्?”

“आवो, तुका न्हायी आमच्या गावातला, त्येचा गुन आला पगा!”

“पर केलं काय त्येनं?

“काय न्हाय. निसता तळवा पोकरून काढला रूपाया येवढा-“

“कशाने?”

“नखुरल्यानं”

“नखुरल्यानं?”

“व्हय? नख काढून टाकायचे हत्यार आसतया न्हाय्याजवळ-“

“रुपाया येयी जागा पोकारली?”

“तर काय!”

“बरा झाला पाय मंग?”

“बरा मंजी ठणठणीत. आता थोडासा दोस होणारच की गा, थोडं लंगाडतो कोळी. पन चौदा आणी गुण हायच म्हणायचा.”
बोलता बोलता दोघे लिंबा जवळ पोहोचले. सावलीत थोडा थांबले आणि परड्यातलं शेळीचं कोंकरू बोलतो तशी कलालान हाळी दिली.
“संपा-“
कोन हाय जी-” किलकिलं करून ठेवलेल्या दारामधूनच आवाज आला,
म्या सोमा कलालाचा! जरा भाईर ये बगू-
अन् उघडाबंद संपा कोळी दारातनं माहेर आला लगडत लंगडत दिडक्या चालीनं लिंबाजवळ आला. मोटच्या चाकासारखा मोलला,
“बालाजी! उनाचं आले-“
“व्हय पर जरा त्या पाण्याच्या पोराचा पाय ग-“
घरात बाजू बदलली आणि पोराचा पाय म्होरं केला.
पडवळ समजूनकि साप हातात हातात पाय घेतला तसा संपा कोळी येरबाडला. हातभर मार्ग सरला भाणि भेदरून बोलला, “आगो बायो गाँ काय व्हो पाय डो! काय झालं म्हणायचं? सापाचा काटा तरी न्हायतर हाडुक बेडूक तरी घुसला असतं पायात?

काय?”

“हाड न्हाय आन् काटा न्हाय पाव्हणं पायनं, सड घुसला म्हून निमित्ठ

“बरं मंग आता-“

“तुमास्नी पण…”

“व्हय मला बी घुसलावता काटा.चांगला टमरेलागत पाय झाला हुता. नासत निगाला हुता-“

“मग काय केलसा? तुका न्हाव्याने म्हणी-“

“व्हय खरं हाय. तुकानंच बरा केला पाय पर लई तरास सोसला. बादलीभर रगात वतून टाकलं. गारगोटीसारखा खड्डा पाडला पायात तवा कुठे… पर पायनं, तुका आताशा हितं नसतुया. काशीदवाडीला गेलाय म्हणी जावायाकडं.”

कधी?’ कलालानं चिखलात पाय पडल्यासारख विचारलं.

“आठवडा आला.”

कलाल आणि लव्हार पाटकुळीवर पाल पडल्यासारखे गप झाले. चेहरे हातनं मांजर मेल्यासारखे काळवंडले. बारीक मोठे डोळे करीत लव्हार कलालाच्या तोंडाकडे बघत होता.

“गवसभाई तरी आसल न्हवं? आता त्येच्या बिगार सद् ना ग!” एकदा कलालाच्या अन् एकदा कोळ्याच्या डोळ्यांत नजर पुनःपुन्हा खुपसून लव्हारानं विचारलं.

“त्यो आसंल खरं, पण पोराच्यानं सोसवल का न्हाय कुणाला ठावं?” असं म्हणून कलालानं पावलं जृठलली. त्याच्यामागं लव्हारही पोराला घेऊन बिगी बिगी निघाला

रणरणतं ऊन विस्तव ओकीतच होतं. त्यात पाय रोवीत कलाल आणि लव्हार चटाचटा चालत होते गोधडीच्या गुंडाळीचा तक्क्या करून गवस भाई नुकताच माचावर आडवा झाला होता. बाहेर माणसांची चाहूल लागताच डावीकडेच्या तवेल्यातलं घोडं जोरान फुरफुरल शेजारच्या गवताच्या बेडीत अंगाचा मुटकुळा करून झोपलेलं गवसभाईचं कुत्रं सुस्तीसोन ताडकन् उभ राहिल आणि दोन देगा टाकून दरयाजात आल!

भेदरलेल्या सशासारखे दोन्ही कान पुनःपुन्हा हलवीत समोर आलेल्या माणसांबर उगाच गुरुराया लागलं,

“हाईल का खान साब?” दाराम्होरनय कल्यानं हाळी दिली.
बारीक चौकड्याची विटकरी रंगाची लुंगी सावरीत गायस माई दारात आला.

कुत्र्याला त्यानं लाथेनंच टरकावलं आणि डोळे बारीक मोठे करीत बाहेर बघत म्हणाला, “की? कोन हाय?

म्या सोमा जी..! सोमा कलाल!”

“का ? भर उन्हात?”

“केस आलीया खानसाब! रिसेंतली हाय..” भिंतीकडेचा आधार घेत कलालानं सांगितलं.

“असं व्हय? बसा बसा.” गवसभाईनं एक जाजम पायानंच खाली अंथरलं,

“बसा…” पुन्हा एकदा तो म्हणाला

लव्हारानं मग पोराला आदवशीर खाली उतखून ठेवला.

विस्तवात पाय भाजलेलं कोंबडं थरथरत उभं रहायं तसं पोरगं सुजलेला पाय अधांतरी घरून कसंबसं उभ राहिलं. खाली बसायचे हे भान त्याच्याजवळ नव्हतं.

“आता हा दादीयाला बाबा आपल्या पायाचं काय करणार?” ही भीती डोळ्यांत साठवून गवसभाईकडं बुबुळ मोनाली करीत बघायला लागले

आडरानात समोर अजगर दिसावा तसा गवसभाई डोळे वटारून पोराकडे बघत होता. अधांतरी नजर रोखून धरून त्यानं बराच वेळ त्याच्या पायाकड पाहिलं. तोंडानंच चार-पाच बेळा च्याक् च्याक्” करून त्यानं विचारलं, “काय झालं म्हणायचं गा बच्चूला? पायात काय हाईलच न्हाय…”

लव्हाराचा चेहरा आणखीनच उतरला.

कुळवाडाला जीव टांगावा तसा तो बोलला, “खानसाब, सड टोचला म्हून निमित्त झालं बगा आन् आट दिवसात ह्योऽ पाय हुन बसला. नासतच चाललाया बरपातूर!

“बरं मंग म्या…?”

“तुमीच ईलाज करा खान्साब… जळवा लावतासा म्हून ऐकलं रासक्रीडा, म्हण आलिया.”

स्थी बात बोल दू भैय्या? जळवा लई आगुरी परकार हाय. पोरगं दम काडल?

“पर विलाज तरी हाय का मंग दुसरा? नासक रगात भाईर पडलं मजी आराम पडल लेकराला..” कल्यालानं मधेच सल्ला दिला..

न्हाई हसलं तरी सोसन चालल्या हाय न्हाई पोराचं?”

मग लावण्या म्हन्तासा जलवा?” गवस भाई

“लावा ना काय- ओठांचा चंबू करून हार म्हणाला उन्हं कलत चालली होती रस्ता अगदीच ओका वाटत होता. एक छोटीशी वावटळ स्वतःभोवतीच गिरक्या घेत अंगावर माती ओतून घेत होती. रस्त्यावर पालापाचोळा उचलून घेत तरातरा धावत होती. उलट-सुलट विचारांच्या गिरक्या घेत मल्हाराची नजर स्था वाटली भोवती भिरभिरत होती. फेर धरून नाचणाया त्याच्या नजरेसमोर वावटळीत मधोमध त्याला एकाएकी जिवाचा आकांत करणे आपलं पोरगं दिसू लागलं. भिजलेल्या पापण्यांचा घरात घेतली. कडा धोतराच्या सोप्या पुसून लव्हारानं बाहेरची नजर गवस भाई यंत्र मानवा सारखा हलत होता. माजघरातर्न एक जीर्ण चटई त्याने पडवीत अंथरली. पुन्हा घरात जाऊन त्यानं एक कटोरी बाहेर आणली..
लव्हार आणि कलाल दोघांनाही त्यानं भिंतीकडेला बसण्याची खूण केली.
लुंगीचा काचा मारून त्यानं मग बैठक मारली. पोराला अलगद खाली बसवून त्यानं हळूच त्याचा पाय उचलून मांडीवर घेतला. त्याची सराईत बोटं त्या फुगलेल्या पायावरून हळूहळू फिरू लागली. पोरं डोळे फाडून समोर गवसभाईच्या तोंडाकडं बघत होतं. त्याच्या ओठांच्या कडा कुंभाराच्या भट्टीबाहेरच्या मातीसारख्या काळ्या पडल्या होत्या. एकाएकीच त्या थरथरू लागल्या. बारीक डोळे करून त्यानं बापाकडं पाहिलं.
याप आणि कला दोघेही जीव ओतून समोर बघत बसले होते.
नऊ दहा वर्षाच्या त्या इवल्याशा जिवानं आता डोळे मिटून घेतले होते. काय चाललंय याची जीवघेणी जाणीव त्या कोवळ्या जिवाला होत होती तरीही काहीच सुचत नव्हतं त्याला. मिटलेल्या पापण्या मध्ये आकांतानं चाललेल्या बुबुळाची केविलवाणी हालचाल बाहेर स्पष्टपणे जाणवत होती. काळसर भुरकट रंगाचे ओठ त्यानं घट्ट मिटून घेतले होते. बापावरची नजर काढून त्यानं आठ्यायर टांगली. एक वेळ दीर्घ श्वास घेतला आणि एक उसळी घेऊन अधांतरी आवाज़ातच एकच केविलवाणी हाक मारली.

भोग सुरू झाला होता.
गवसभाईनं एक दाभणासारखी जाड सुई त्या काळ्यानिळ्या छोट्याशा पायाच्या कडेला पाचसहा ठिकाणी टोचली. आणि थोड थोड काळंभोर रक्त त्या तळपायातून डोकावू लागलं, खाली एक पितळी ठेवून गवसभाईनं त्यावर पाय अधांतरी धरला होता बाजूच्या कटोरीमधून मग एक एक जळू काढून तो पितळीत ठेवू लागला.
सात-आठ निळ्या जाभळ्या जळवा काढून त्यान पितळीत ठेवल्या आणि एक एक जळू चिमटीत पकडून तो त्या रक्ताच्या तोंडाशी चिकटवून ठेयू लागला.
चार-दोन सेकंदात ती जळू पायाला चुकून बसू लागली.

छोट्या कोवळ्या जिवांचा आरडाओरडा सुरुच होता लव्हारानं त्या सर्वांग पकड़ून ठेवलं होतं. त्याचे डोळे अरंज वाहत होते हात शरभरत होते.

लाल डोळे विस्फारून साऱ्या प्रकाराकडे बघत होता. एक फुगलेली जळू ओढून गवसभाईनं पायांपासून अलग केली. तळहातावर उलटीसुलटी नाचवली

म्हशीचा सड पिळावा तशी एका हाताने धरून दुसऱ्या हाताच्या दोन्ही बोटांनी पिळून काढली. आर्धी पाऊण ओंजळभर काळं काळं रक्त खाली ठेवलेल्या दगडी भांड्यात पडलं.

बराच वेळ असंच होत राहिलं.

तबेल्यातलं घोडं डोळे किलकिले करून बाहेर चाललेल्या प्रकाराकडे बघत होतं. गयस भाईच्या कुत्र्याने जमिनीवर हनुवटी टेकवली होती. त्याची बुयुळे भुईयस्नंच चारी दिशांना फिरत होती.

सोमा कलाल समोर काळ्या रक्तानं भरून गेलेल्या दगडी भांड्याकड टक लावून बघत बसला होता.

बापाच्या जिवाची घालमेल चाललीच होती लोहाराच्या भाल्यासारखी खालीवर होणारी पोटच्या गोळ्याची छाती बघून त्यानं धीरच सोडला. असह्य होत चात े त्रासानं पोरं निपचित पडलं होतं. अनेक अशुभ विचारांच्या जळवांनी लव्हाराच्या मनाला पक धेरलं होतं. क्षणभरातच त्यानं मनाला दाभणानं टोचलं आणि एक एक करून शेकडोजळया त्याच्या मनाला लोंबकळू लागल्या.गवसभाईचं काम सुरूच होतं. दगडी भांड भरून कधीच वहायला लागलं होतं. बाजूच्या कटोरीत तीन-चार जळवा सुस्त होऊन पडल्या होत्या.

एकाएकीच पोराच्या घशातून घरघर ऐकू यायला लागली. त्यानं डोळे तारयटले.

काळ्या ओठांभोवती पांढऱ्या फेसानं फेर धरला होता. हातापायाला झटके देत त्यानं शुद्ध हरपून मान टाकली,

आण्णा लव्हार गवसभाईच्या हाताकउं बघतच बसला होता,

अजून किस्तं रगत नासलया ते आम्हाला म्हाईत.” असं म्हणून त्यानं पिळून घेतलेली आणखी एक जलू पोराच्या पायाला लावली आणि समोर बघत अदाला हात जोडले.

बोटासारख्या फुगलेल्या दोन-चार जळवा आपोआपच खाली पडत होत्या आणि पिळून पुन्हा लावलेल्या जळचा अधाशासारख्या पायावर तुटून पडत होत्या

फेस येत चाललेल्या पोराच्या तोंडाकडे बघत आण्णा लव्हार एकाएकीच मुसमुसून रडायला लागला. त्याच्या चेहयावरून हात फिरवीत आपल्या कानशिलाशी दाही बोट भोळी करायला लागला

क्षीण होत धाडलेल्या पोलच्या गोळ्या तोडकर डोळे ओढून त्यान एकवार गवसभाईकडं बघितलं.

पोराच्या तोंडाबाहेर आता खूप फेस जमा झाला होता. त्यानं दोन-चारवेळा अंगाला झटके दिले. हातपाय ताणले आणि पुन्हा ते निपचित पडलं. सोमा कलाल अवाक् होऊन चाललेल्या प्रकाराकडं बघत होता. गवसभाईच्या गोठ्यातलं घोड़ं पुनःपुन्हा फुरफुरत होतं. कान ताठ करून सारखं आत बघत होतं. पोराच्या फेस येत चाललेल्या चेहऱ्याकडं कोपऱ्यातलं कुत्रं डोळे लावून बघत होतं.

आण्णा लव्हाराला एकदमच गलबलून आलं. त्याची नजर एका जागी ठरत नव्हती, तोंडाला कोरड पडली होती. एकाएकीच थंडीने हुडहुडी भरावी तसं त्याचं अंग कापू लागलं, पोराचे चाललेले हाल त्याला असा व्हायला लागले. जागोजागी भिरभिरणारी त्याची नजर एकदमच गवसभाईच्या डोळ्यांवर स्थिरावली.

पोरांच्या गोष्टीतल्या मांत्रिकासारखा गवसभाई दिसत होता, सुस्त झालेली एक जळू होती. त्या हातात लव्हारानं ती पाहिली. त्याच मन ओलांडून पुढे येत हळूहळू ती जवळ यायला लागली. एकाएकी मोडी मी व्हायला लागली. खूप खूप मोठी लव्हाराच्या डोळ्यात ती मावेनाशी झाली. आभाळाएवढी जळू तिच्या पाठीवर बसून आपला लाडका म्हपा आकाशात लांब लांब जायला लागलाय असं क्षणमात्र त्याला वाटायला लागलं. गवसभाईची लांबलचक पांढरी दादी म्हेपान पकडून ठेवलीय असा भास उगाचच त्याला व्हायला लागला व त्याने एकच हंबरडा फोडला.

“माझ्या सोन्याच्या तुकड्या sss’ अशी साद महिपाला पुनःपुन्हा घालीत भितीवर डोके आपटून घ्यायला लागला.

सोमा कलाल धोतरानं सोप्यान डोळे कोरडे करीत होता काळा निळा जळू आणि प्रगत होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: