तुम साथ हो

 शीतल दरंदळे

आज HR कडून मेल आल्यावर विभा खूप वैतागली होती. 50 percent salary cut for next 3 months. ही ओळ तिला वारंवार दिसत होता. आधीच वर्क फ्रॉम होम ने काम वाढलंय,घरी करा,ऑफिस साठी सतत present रहा. त्यात अबीर ला ही जॉब ची guarantee वाटत नव्हती. होम लोन,कार लोन अलोक ची शाळेची फी,घरखर्च कसं निभावणार? ती सतत येरझाऱ्या घालत होती. कशातही लक्ष लागत नव्हते.

अबीर बेडरूम मध्ये आला तिच्याकडे पाहत त्याने कॉफी टेबल वर ठेवली.

“विभा Are you OK ?, कॉफी घे”

“घेते, I am fine,I am fine”

“अग ते आईबाबांच्या अकाउंट मध्ये मनी ट्रान्सफर करायचे होते, तू दरवेळी करतेस म्हणून आठवण करायला आलो होतो”.

“नाही जमणार आता 3 महिने,सांगून टाक त्यांना”.

“विभा ??” अबीर जरा आवाज वाढवूनच म्हणाला.

“Just shut up,आवाज वाढवू नकोस,इथे आपला विचार करायचा की नाही? त्यांना गावाला असं काय लागणार आहे रे,तीन महिने adjust करा म्हणावं”

“तू अति बोलतेस आज,मी बघतो,माझे आईबाबा आहेत”. अबीर त्रासिक आवाजात बोलला.

“Just get lost,money matters” विभा ओरडली.

अबीर रागाने दार आपटून निघून गेला.

छोटा अलोक सगळं ऐकत होता,शांतता झाल्यावर तो TV बंद करून विभाच्या रूम मध्ये आला.

“अलोक,बेटा not now,मम्मी is very busy ” विभा लॅपटॉप मधील नजर बाजू न करता म्हणाली.

“Ok मॉम, एक विचारू फक्त” विभाने त्याच्याकडे पेश्नार्थक पाहिले.

“आजी आजोबा मरतील का ग आता?”  अलोकचा निरागस प्रश्न आणि आजी, आजोबा बद्दलची  काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली.

“अलोक इकडे ये,काय झालं? असं का बोलतोस” विभा ने त्याला जवळ घेत खूप प्रेमाने विचारले.

“News मध्ये मगाशी दाखवत होते, की पैसे नसल्यामुळे अनेक जणांना मरावे लागेल” अलोक

” नो नो, I promise they are safe, go and eat your favorite chocolate cookies”

“Ok mumma”

विभा परत कामात गुंतली,कॉल वर कॉल चालू होते,रात्री 9 वाजता ती मोकळी झाली.किचन मध्ये पाहिले तर अलोक चे जेवण आटोपले होते.तिला जेवायची इच्छा च नव्हती. तिने फक्त दूध पिऊन सगळी झाकपक केली. फ्रेश होऊन ती बेडरूम मध्ये आली. अलोक गाढ झोपला होता. अबीर काही वाचत बसला होता.

“तुम्ही जेवलात दोघे ?” विभा

“हो, good night” अजून काही न विचारता अबीर ने पुस्तक बंद करून झोपायची तयारी केली.

“अबीर जरा बाहेर येना,बोलायचंय” अबीर नाराजी दाखवत बेडरूम च्या बाहेर हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन बसला.विभाने त्याचा हात हातात घेऊन म्हणाली 

” चिडचिड होतेय रे, सगळं negative वाटतंय” विभा स्वतःची मनस्थिती सांगते.

“माझं ही असंच होतंय खर तर, आता थोडं एकमेकांना समजुन घेऊयात ना, आपण एकत्र असलो तर कुठल्याही प्रसंगला सामोरे जाऊ शकतो” अबीर समजुतीने म्हणाला.

“ऐक ना, मी एक FD मोडली आहे, उद्या पैसे होतील जमा अकाउंट मध्ये,तू सगळे ट्रान्सफर कर लगेच त्यांच्या account मध्ये”

“काय? खरंच” अबीरने आश्चर्याने विचारले.

“हो, मी नवीन फोन घेता यावा म्हणून 6 महिन्यांपूर्वी केली होती,पण आता या पैशाची आईबाबांना जास्त गरज आहे,माझा फोन वर्षभर सहज चालेल की” विभा त्याला उत्तर देते.

“तू माझं टेन्शन एकदम घालवलस ग” अबीर हायसं होऊन म्हणाला.

“इसि बातपे एक maggie with coffee हो जाये, तू ही काही खाल्लं नसशील माहितेय मला” विभा हसून अबीरला म्हणाली.

“I love you so much” त्याने तिला जवळ ओढले.एक गाणे लावतो खास तुझ्यासाठी.

तिने मिठी सोडवत,लाजून हसत विचारले “आधी खाऊयात का?”

“हो हो,खूप भूक लागलीये”. 

दोघेही हसत हसत किचन मध्ये  तयारी करू लागले. गाणे वाजत राहिले.

अगर तुम साथ हो
दिल ये संभल जाए
अगर तुम साथ हो
हर ग़म फिसल जाए
अगर तुम साथ हो
दिल ये निकल जाए
अगर तुम साथ हो
हर ग़म फिसल जाए

One thought on “तुम साथ हो

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: