जळवा

बबन पोतदार ऊन्ह कासराभर वर आली होती. तापलेला फुफाटा पायांची लाहीलाही करीत होता. लांबवर भैरोबाच्या देवळाचं शिखर दिसायला लागलं होतं. पोराला खांद्यावर बसवून अण्णा मल्हार टुकूटुकू चालला होता. एक एक पाय रेटत होता. पाटील बाबाची टेकडी संपली आणि कापुरहोळचा ओढा लागला. पाणघळीत पाण्याचा टिपूस नव्हता, ओढ्याच्या पात्रातले दगडगोटे आणि वाळू, भट्टीतल्या लोखंडासारखे तापले होते. त्यावर... Continue Reading →

मोगरा फुलला

शीतल दरंदळे आज दांडेकर चाळीत परत ओरडण्याचा आवाज येत होता. मुंबईतली दांडेकर चाळ. 3 मजली 25 खोल्या. त्यात 3 ऱ्या मजल्यावरचे शेलार कुटुंब. दोन खोल्यांचं घर. म्हणायला दोन खोल्या पण आतली खोली म्हणजे फक्त एक ओटा आणि मोरी. बाहेर दहा बाय दहाची खोली. या घरात सातमाणसं. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेला गोविंद त्याची बायको गंगा. गोविंदचे... Continue Reading →

नोटबंदी

दिप्ती सुर्वे-जाधव एव्हाना कौलाच्या फटीतून पाऊस आत शिरायला लागला होता. टपटप गळणारे अश्रू पुसत आक्की गळत्या जागी टोपं मांडायला लागली. मोडकळीस आलेल्या वाश्याकडे एकटक पाहणाऱ्या अण्णाचे डोळे स्थिर झाले होते."लक्ष्मे…SSS… मी चाल्लो गं…SSS…" बोलताना आण्णाला धाप लागली."धनीSSS.. सांच्याला वंगाळ बोलू नगासा." चुलीवरच्या भाताच्या उकळीत काविलता फिरवत आक्की बोलली."आक्के… आण्णा असं काय करायलाय. डोळं झाकत नाय... Continue Reading →

लगाम

यशराज शंकर आचरेकर कोलगेट, साबण, तेलाची बाटली आणि अनुने सांगितलं तसा नवीन लायटर. चार तर गोष्टी, पण तरी मी पुन्हा एकदा सामानाची पिशवी नीट चेक करतो. काउंटरला माझ्यापुढे दोघेच जण. पाच मिनिटात येईल आपला नंबर.मी कॅशिअरच्या पुढ्यात सगळं सामान नीट मांडून ठेवतो.किती वेळ झाला आणि हा अजून खाली मान घालून आकडेमोडच करतोय. एकतर एवढं उकडतंय... Continue Reading →

लव्ह बर्ड्स

प्राजक्ता रुद्रवार आज सकाळपासुन तिसरयांदा सासुबाई म्हणाल्या होत्या, "पुर्वा ह्या लव्ह बर्ड जोडीतली ही मादी पिल्लं देत नाहिये तर दुसरी मादी तरी आणा...नुसती जोडीने सोबत रहाते पण कधी पिल्लं देणार देव जाणे..." पुर्वाच्या डोळ्यात पाणी आलं असणार हे तिच्याकडे न पहाताच निखिलच्या लक्षात आलं होतं. आईला पण काय तो लव्ह बर्ड्सच्या पिल्लांमधे इतका इंट्रेस्ट आहे... Continue Reading →

प्रसंगावधान

प्रदीप गांधलीकर त्यावेळी मी नुकताच महाविद्यालयात जाऊ लागलो होतो. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण खेड्यात पार पडले; आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी अकरावीत तालुक्याच्या गावी अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. घरात बरीच वर्षे मी एकटाच असल्याने लाडाकोडात वाढलो होतो. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर होता. शेती तशी जेमतेमच होती. प्रसंगी वडील काबाडकष्ट करीत; परंतु त्यांनी कधी मला परिस्थितीची... Continue Reading →

गाठभेट

बबन पोतदार गेली आडीच तीन म्हैस हातरुन धरलेल्या शांताबाईचं आज काय खरं नव्हतं. सकाळचं धा वाजल्यापास्नं घशाला घरघर लागली होती. बुबळ आतल्या आत सैरभैर धावत हती. उशापायथ्याला तिच्या तिन्ही लेकी बसून हुत्या. तिगींचंबी डोळे रडून रडून सुजून गेलतं. "आईऽऽ ए5ऽ आईऽss' सखूनं, थोरलीनं तिचं कपाळ कुरवाळीत दोनचार येळा हाळ्या मारल्या. बुबुळ नुस्तीच हालत न्हाई. हैं... Continue Reading →

तुम साथ हो

 शीतल दरंदळे आज HR कडून मेल आल्यावर विभा खूप वैतागली होती. 50 percent salary cut for next 3 months. ही ओळ तिला वारंवार दिसत होता. आधीच वर्क फ्रॉम होम ने काम वाढलंय,घरी करा,ऑफिस साठी सतत present रहा. त्यात अबीर ला ही जॉब ची guarantee वाटत नव्हती. होम लोन,कार लोन अलोक ची शाळेची फी,घरखर्च कसं निभावणार?... Continue Reading →

तानुल्या

महानंदा मोहिते सोप्यात अडकवलेलं शिंग तानुल्या आपुलकीने बघायचा. या शिंगावर धन्याचा खूप जीव…"सर्जा''.. त्याच्यासाठी बैल नव्हता.. धन्याने पोटच्या मुलासारखं त्याला सांभाळलं होतं त्याचंच ते शिंग.. सर्जाची शेवटची आठवण म्हणून जपलेलं.शिरप्या चा 'श्रीपतराव ' बनवण्यात सर्जाचा मोलाचा वाटा होता. सर्जाची मेहनत तानुल्या जाणून होता. सर्जा ऐन तरण्या वयात गेला. धन्याला ही सल बोचून खात होती. सर्जा... Continue Reading →

जग्गू बंबाळ

हिंमत पाटील कृष्णाकाठची गावखेडी म्हणजे एकेकाळची वाडासंस्कृतीची माहेरघरे. काळाच्या ओघात सारे नष्ट झाले. गावपांढरीची पडझड झाली. आता गावंही मोठी झाली. लोकं वेशीबाहेर पांगली. गावगाडा बदलला. गावभाग ओस पडले. ढिगारमातीच्या झाडाझुडपांतून डोकावणारे जुने काही अवशेष सोडता, मोडकळीला आलेले चार-दोन वाडे कुठेतरी. बाकी सारी भयाणभूस खिंडारंच. भवताल सजून गावपांढरीलगतच नव्या वस्तींची नवी गावं झाली. बघून बघून गावालगतच्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया