‘लॉकडाऊन’ची आत्मसिद्धी

बालाजी मक्तेदार, उस्मानाबाद

दररोज भांबावलेला विनय, आज अगदी शांत होता, कसली दगदग ना घाई..! सकाळी उठून ऑफिसला जाणारा, स्वतःच्याच दुनियेत मश्गुल असणारा, ना उद्याची चिंता ना आजची फिकीर.. पण लॉकडाऊन पडलं आणि त्याने स्वतःच्या दुनियेतच थोडसं डोकावलं. अन हळूहळू भूतकाळात डोकावू लागला..!

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो त्या व्यक्तीचे मन राखतो, त्याला दुःख होईल असे वागत नाही त्याला सतत आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो त्यासाठी प्रसंगी स्वतः त्रास सहन करतो पण त्याला हवे तसे वागतो. त्याचे सुख पाहतो.

आता समजा आपण स्वतःवर प्रेम करत असू तर आपण आपल्याला जे हवे ते पुरवू, आपले शरीर जी मागणी करेल ते पुरवू.
पण प्रत्यक्षात आपण तसे करत नाही आपण स्वतःला खूप त्रास देतो, स्वतःच्या हिताच्या गोष्टी करत नाही. म्हणजे कसे आपल्याला झोप येत असते पण आपण झोपत नाही कारण अनेक. आपल्याला भूक लागते आपण वेळेवर जेवण करत नाही कारण अनेक, आपल्याला विश्रांतीची गरज असते आपण विश्रांती घेत नाही कारण अनेक.

व्यायाम करत नाही, पथ्य करत नाही, सकस आहार घेत नाही, ध्यान प्राणायाम करत नाही, वेळेत दवाखाना करत नाही किती गोष्टी आहेत ज्या आपल्या हिताच्या आहेत त्या करत नाही व ज्याच्यामुळे त्रास होतो अश्या गोष्टी करतो दारू पितो, सिगारेट ओढतो, अनावश्यक जागरण करतो, जंक फूड खातो, अहोरात्र फक्त धावतो स्वतःकडे स्वतःच्या सुखाकडे पहातच नाही कारण आपले स्वतःवर प्रेमच नाही आपण उगी समजतो तसे.

जो स्वतःवर प्रेम करत नाही तो दुसऱ्यावर काय करेल.याचे प्रेम कंडिशनल असेल जो पर्यंत समोरचा मनाप्रमाणे वागतो आहे तोपर्यंतच तो चांगला त्याच्यावर प्रेम त्याने जरा तुमच्या मनाविरुद्ध वागावे तो लगेच वाईट ठरतो तिथे लगेच प्रेम संपते.
कारण ते प्रेम कंडिशनल होते.

जो स्वतःवर प्रेम करतो तो दुसर्यावरही अन-कंडिशनल प्रेम करू शकतो जे कधी संपत नाही.

हे सगळं आठवून लॉकडाऊन काळातील झालेली आत्मसिद्धी पाहून स्वतःशीच हसून उठला अन.. आपल्या कामाला लागला.

समाप्त.

One thought on “‘लॉकडाऊन’ची आत्मसिद्धी

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: