हरवलेल पाकीट

सागर सोनवणे

प्रिय,
हो हो प्रिय,आपल्या मित्राला,दोस्ताला,सख्याला,जिवलगास किंवा भावाला प्रिय असेच म्हणतात ना ? म्हणुन तू प्रिय..

मी असाच एका दूकानात धूळ खात पडलेलो होतो,मी तूझ्याकडे आलो ते ८ एप्रिल २०१६ ला तुझ्या वाढदिवसा-दिवशी. तूझ्या ताईने भेट म्हणुन मला तुझ्या स्वाधीन केले अन् तेव्हां पासून माझ जीवनच बदलुन गेले.

मी तुझ्याकडे आल्यापासुन म्हणजे जवळ जवळ अडीच वर्षात तु मला एक ही दिवस विसरला नाहीस. तूझ्या घरच्यान एवढेच तु माझ्यावर प्रेम केलेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तू नवनवीन खिसे असलेली पँट घ्यायचा ती माझ्यासाठीच .मी त्यामध्ये मावेल की नाही ते पाहुनच, मला नेहमी तू मागच्या खिशामध्ये ठेवायचास अन् तु जाशील तेथे घेऊन जायचास .तुझ्या सर्व जीवनावश्यक वस्तु तु विश्वासाने माझ्याकडे ठेवायचास. तूझ्या सोबत येताना मी नेहमीच आंनदी असायचो, हो त्रास होयचा तो तु बसल्यावर, कारण तुझा सर्व भार माझ्यावर असायचा. १५० किलो तु तुला तेवढ सहन करायला लागायच.. पण दुकानात धूळ खात बसण्यापेक्षा हे खूप छान होत.

नेहमीप्रमाने मला घेउन तु मित्रांन सोबत गणपती पहायला चालला होतास ते 22 संप्टेंबर २०१८ ला त्या अगोदरही आपण ३,४ दिवस गणपती पाहिले, दर्शन घेतल. त्या दिवशी तुम्हीं नाष्टा केलात अन् तु माझ्याकडुन काही पैसे घेतले हॉटेल मालकाला दिले अन् मला खिशात ठेवले. नंतर आपण कसबा गणपतीचे दर्शन घेतले अन् तेथेच मला तुझ्या खिशातुन कोणीतरी काढून घेतले. तुझ ही लक्ष होत तु खिशाला हात लावू पय्ँत मला बाहेर काढ़ल होत, मी जिवाच्या आकांताने ओरडत होतो, रडत होतों पण गर्दीच एवढी होती की तु मला पाहू शकत नव्हता.

अन् येथेच आपण एकमेकांन पासून हरवलो.हे सर्व येथेच थांबले नाही, तु गेलास अन् मला ज्या व्यक्तीने घेतले त्याने फाडुन रस्त्यावर फेकुन दिले ,त्याने तु मला ठेवायला दिलेले सर्व पैसे काढुन घेतले , तुझे फोटो,हरीपाठाचे पुस्तक अन् मला फेकुन दिले त्या प्रचंढ गर्दीत सर्वांनी मला तुडवले अन् आपल्याला अलग केले . तुझ्या काही गोष्टी मी नाही सभांळू शकलो त्याबद्दल माफ़ी मागतो. अन् तु माझ्यावर केलेल्या प्रेमा बद्दल, विश्वासा बददल आभार मानतो. मला पुन्हा एकदा दुकानातुन नवीन रुपात घे ही विनंती करतो.

तुझंच हरवलेल पाकीट…….!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: