अलिखित पत्र…..

आज संपर्काच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरीही मी अजूनही जिवंत आहे. आता फक्त भावना नाही तर महत्वाच्या कामासाठी माझ्या मार्फत व्यवहार होतोय. लक्षात आलंच असेल, अगदी बरोबर ओळखलंत… हो मी पत्रचं आहे…! 

दचकलात ना. हो दचकणारच ना कारण माझं दर्शन तर सोडाच नाव घेणं देखील दुर्लभ झालंय अशा युगात या “पत्र” रूपी माध्यमातून तुझ्याशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न…! बघ किती जमतंय का तुला या विश्वात माझ्याही भावना वाचायला…! 

तर माझा जन्म हा सोळाव्या सतराव्या दशकातील, साल, जन्मतारीख तेव्हा कुठं होती म्हणा..! तेव्हाच्या जन्म तारखा म्हणजे काही आकस्मित घटना, महापूर, भूकंप आदी असायच्या.. फारतर गोठ्यातल्या गायीला जन्मलेला वासरू किंवा आपण जन्मलो तर ते लक्षात ठेवायचे माणसं त्या धावपळीत आमच्यासारख्या निर्जीवांची काय दशा..! बरं, असो मुद्दाच बोलू.. तसही आजकाल माणसं मुद्यासाठी मुदतीतच बोलत आहेत. त्यामुळे आपण जास्त न बोलता मुद्द्याचंच बोलावं.. बरोबर ना..
तेंव्हा आम्हांला लय भाव.. अगदी राजे-महाराजांच्या भावना, संदेश, आदेश आम्ही लोकांपर्यंत पोहचवायचो.अगदी त्याची भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आम्हांला नको नको तिथं बसावं लागायचं, कधी ओट्यावर, तर गल्लीच्या मोक्याच्या ठिकाणी तो आम्हांला दगडाखाली ठेवायचा अन ती अलगद येऊन घेऊन जायची. त्या भावना पोहचवितांना काय आनंद व्हायचा सांगू. अहाहा.! 
दुःखाची खबरबात देतांना तर जीव नको नकोसा व्हायचा. पण आपलं काम आपण इमानेइतबारे करावं म्हणून आम्हीही करायचो.देशविदेशातील वाऱ्या चालू झाल्या.. जग आधुनिक प्रगती करू लागलं. यंत्र, तंत्र च्या जोरावर नाही नाही ते बनू लागलं.. मी आपला टपालात, आणि कॉलेजच्या डायऱ्यात पडून मस्त जीवन जगत होतो. येणाऱ्या काळाची थोडीही चाहूल नव्हती.. 
अगदी घरात सोडलेला सांडासारखं खाऊन पिऊन जोमात. हळूहळू औद्योगिक क्रांतीचा सगळ्या जगात शिरकाव होऊ लागला. ‘क्रांती’न पोरांचं नशीब बिघडवलेली होती. पण माझ्या करंट्याच्या तिनं नशिबी यावं.. अन आलीच ना..! 
संगणक आला तसा मला काहीही फरक पडला नव्हता पण त्यातील बद्दल मात्र हळूहळू वाढत जात होते. आळशी माणसाला तेच पाहिजे होतं. अन त्यात भर मोबाइलही आले.. पहिल्यांदा बटनाचा होता तोपर्यंत फक्त मॅसेज पर्यंत ठीक होतं पण स्क्रीनटच मोबाईल आला अन आमच्या आयुष्याचा पार चिंध्याडा झाला. 
आज अगदी लहानग्यापासून ते थोर मोठ्यांपर्यंत मोबाईल आले. आता मी फक्त उरलोय कोर्ट, कचेरीत आणि प्रशासकीय कामात. काही दिवसात या मेल, मेसेजिंगच्या जमान्यात ‘पत्र’ होतं. असा भूतकाळ वचनी शब्द वापरला जाईल. त्यात नसण्याचं दुःख नसेल मला पण त्या मायेनं-लेकराला, प्रियसीने-प्रियकराला, बाप्पांन-लेकीला अन त्यानं तिला लिहलेला मायना, त्या भावना, ते अश्रू, ती वेळ तुमच्यासोबत यातलं काहीही शेअर करता करता येणार नाही. प्रायव्हसीच्या जमान्यात फक्त या सगळ्या भावनेला एक 4*6 च्या मोबाईल मध्ये बंदिस्त होताना खरंच दुःख होत..
असो..! अलविदा मित्रानो…! ओळख राहू द्या..! 

तुमचाच अलिखित पत्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: